राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघाला आलेलं अपयश, मुख्य प्रशिक्षक जोर्द मरीन यांना भोवण्याची शक्यता आहे. साखळी सामन्यांमधली निराशाजनक कामगिरी आणि कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात भारताला इंग्लंडविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉकी इंडिया मुख्य प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या कामगिरीचं मुल्यमापन करण्याची शक्यता आहे. पी. आर. श्रीजेश, कर्णधार मनप्रीत सिंह, रुपिंदरपाल सिंह यांच्यासारख्या खेळाडूंनी संघाच्या ढासळलेल्या कामगिरीबद्दल हॉकी इंडियाला स्पष्टीकरण दिल्याचं समजतंय. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार असल्याचं समजतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गोल्डकोस्ट येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताच्या पुरुष व महिला संघाला अपयशाचा सामना करावा लागला होता. हा पराभव हॉकी इंडियाच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. याचसोबत आगामी काळात भारतीय हॉकी संघ चॅम्पियन्स ट्रॉफी, आशियाई खेळ आणि विश्वचषक यांसारख्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. त्यामुळे मोठ्या स्पर्धांमध्ये उतरताना संघ नेमका कुठे कमी पडतोय हे जाणून घेण्यासाठी मुख्य प्रशिक्षकांसह खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेण्याचं हॉकी इंडियाने ठरवलं असल्याचं समजतंय.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पाकिस्तान, वेल्स यांच्याविरोधात चांगलचं झगडावं लागलं होतं. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारताला शेवटच्या सेकंदात बरोबरीवर समाधान मानावं लागलं होतं. तर वेल्सविरुद्ध सामन्यात भारताला अखेरच्या क्षणापर्यंत विजयासाठी झगडावं लागलं होतं. भारतीय खेळाडूंच्या या कामगिरीवर हॉकी इंडियाचे पदाधिकारी नाराज असल्याचं कळतंय. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात भारताला २-२ अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं होतं, तर वेल्सविरुद्ध सामन्यात भारताने अखेरच्या मिनीटामध्ये गोल करत ४-३ असा विजय संपादन केला होता.

जोर्द मरीन यांच्याआधीही रोलंट ओल्टमन्स, टेरी वॉल्श, मायकेल नॉब्स, रिक चार्ल्सवर्थ यांसारख्या प्रशिक्षकांना नेमणुकीवरुन व संघाच्या खराब कामगिरीवरुन हॉकी इंडियाची नाराजी स्विकारावी लागली होती. सध्या जोर्र मरीन हे नेदरलँडला आपल्या घरी आहेत. मे महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय शिबीरात मरीन सहभागी होणार आहेत. त्यामुळे हॉकी इंडियाच्या बैठकीत मरीन भारताच्या खराब कामगिरीचं काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.