मैदानावर गैरवर्तन करणारा एसी मिलानचा आघाडीपटू मारिओ बालोटेलीवर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. या सामन्यात नेपोलीने एसी मिलानवर २-१ अशी मात केली होती. एसी मिलानसाठी खेळताना पहिल्यांदाच पेनल्टीवर गोल करण्यात बालोटेलीला अपयश आले. मात्र त्यानंतर त्याने या सामन्यात एक गोलही केला. हा गोल एसी मिलानला विजय मिळवून देऊ शकला नाही. मैदानावरील पंचांशी हुज्जत घातल्याप्रकरणी सामना संपल्यानंतर बालोटेलीला दुसऱ्यांदा पिवळे कार्ड दाखवण्यात आले. दोन पिवळे कार्ड मिळाल्यामुळे बालोटेलीवर एका सामन्याची बंदी असणार होती. मात्र त्याच्यावर अतिरिक्त दोन सामन्यांसाठीही बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णय न पटल्याने पंचांशी अपमानकारक भाषेत आणि आक्रमक पवित्रा घेऊन नाराजी प्रकट केल्यामुळे बालोटेलीला ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
बालोटेलीवर तीन सामन्यांची बंदी
मैदानावर गैरवर्तन करणारा एसी मिलानचा आघाडीपटू मारिओ बालोटेलीवर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. या सामन्यात नेपोलीने एसी मिलानवर २-१ अशी मात केली होती.
![बालोटेलीवर तीन सामन्यांची बंदी](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2013/09/spt0221.jpg?w=1024)
First published on: 25-09-2013 at 04:44 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mario balotelli gets three match ban for red card