Marizanne Kapp has overtaken Tara Norris:महिला प्रीमियर लीगचा आठ सामन्यानंतरही उत्साह कायम आहे. शनिवारी डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सवर १० विकेट्सने मोठा विजय मिळवला. दरम्यान दक्षिण आफ्रिकेची खेळाडू मारिजन कॅपने रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव नोंदवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मारिजनने १५ धावांत ५ विकेट्स घेतल्या –

३३ वर्षीय मारिजन कॅपने महिला प्रीमियर लीगमध्ये चमकदार कामगिरी करणे सुरूच ठेवले आहे. मारिजनने ३.७५ च्या स्ट्राईक रेटने ४ षटकात १५ धावा देत पाच विकेट्स घेतल्या. यासह ती लीगमधील सर्वोत्तम गोलंदाज ठरली. त्याबरोबर तिने लीगमध्ये पाच विकेट घेणारी अमेरिकेची तारा नॉरिसही मागे टाकले आहे. तारा नॉरिसही दिल्ली कॅपिटल्सकडून खेळते.

तिने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २९ धावांत ५ विकेट्स घेणारी नॉरिस पहिली गोलंदाज ठरली होती. याशिवाय गुजरात जायंट्सच्या किम गर्थनेही पाच विकेट घेतल्या आहेत, मात्र ती धावांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिने ३६ धावांत पाच विकेट्स घेतल्या.

हेही वाचा – WI vs SA: धक्कादायक! विकेट घेतल्याचा आनंद साजरा करायला गेला, अन् स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर पडला

२००९ मध्ये, दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पण केले होते –

मारिजनने २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी पदार्पण केले होते. आतापर्यंत तिने ९४ टी-२० सामन्यांमध्ये ११७८ धावा केल्या आहेत आणि ७६ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे तिने १२९ एकदिवसीय सामन्यांमध्ये २३६७ धावा केल्या आणि १४७ विकेट्स घेतल्या. तिने दोन कसोटीत २१२ धावा केल्या आहेत, मात्र विकेट घेण्यात ती यशस्वी होऊ शकली नाही.

मारिजनला १.५० कोटींची बोली लागली होती –

महिला प्रीमियर लीगमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अष्टपैलू खेळाडूला जास्त मागणी होती. लिलावात तिची मूळ किंमत ४० लाख रुपये होती, परंतु मागणी जास्त असल्याने ती १.५० कोटी रुपयांना विकली गेली. मारिजनला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले.

हेही वाचा – IND vs AUS 4th Test: शुबमन गिलने शतक झळकावत रचला विक्रम; सचिन-विराटच्या ‘या’ खास क्लबमध्ये झाला सामील

सामन्याबद्दल बोलायचे तर, महिला प्रीमियर लीग (WPL) च्या नवव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जायंट्सचा १० गडी राखून पराभव केला. दिल्लीने १०६ धावांचे लक्ष्य केवळ ७.१ षटकात पूर्ण केले. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरातने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गुजरात संघाने 20 षटकांत ९ गडी गमावून १०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीने ७.१षटकात बिनबाद १०७ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marizanne kapp has overtaken tara norris to become the best bowler in the wpl 2023 in dcw vs ggw match vbm
Show comments