मार्क वॉ हा क्रिकेटमधील सर्वोत्तम स्लिप कॅच घेणाऱ्या खेळाडूपैकी एक म्हणून ओळखला जातो आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपूर येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात होण्यापूर्वी, स्लिप-कॅचिंग कामगिरीबद्दल चर्चा करण्यासाठी त्याच्यासोबत इरफान पठाण आणि रवी शास्त्री सामील झाले होते.

ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि भारतासाठी विराट कोहली हे स्लिप क्षेत्ररक्षक होते आणि दोघांनीही प्रत्येकी दोन झेल सोडले. त्यात दुसरा दिवस संपण्यापूर्वी रवींद्र जडेजाचा एक झेल स्मिथने सोडला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातही भारतासाठी स्लिपमध्ये खराब खेळी केल्याबद्दल वॉने यापूर्वी विराट कोहलीवर टीका केली होती.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Satish Wagh murder case, Pune police, Pune ,
सतीश वाघ हत्या प्रकरण : नवनाथ गुरसाळे आणि पवन शर्मा दोन आरोपींना अटक अन्य आरोपींचा शोध सुरू
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Navri Mile Hitlarla
“आता भूतासारखीच…”, लीला नेमकं काय करणार? पाहा ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय होणार

त्यानंतर स्टार स्पोर्ट्सच्या प्रस्तुतकर्त्याने ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये काय बोलले जात आहे याबद्दल वॉला विचारले. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर उत्तर शोधत असताना पठाणने चेंडू उचलला आणि सरळ वॉवर फेकला, ज्याने तो आरामात पकडला. स्मिथच्या स्लिपमधील घोडचुकीचा उल्लेख करत शास्त्रींनी लगेच ऑसी संघाची खिल्ली उडवली, ते म्हणाले “तेच हरवले होते, तुम्हाला एका हाताने झेल घ्यावा लागेल. तुम्ही तर तज्ञ आहात, भाऊ!”

त्यानंतर वॉने स्मिथच्या गमावलेल्या संधींबाबत आपले मत मांडताना तो म्हणतो, “त्याने तीन झेल सोडले हे निराशाजनक आहे. हे अतिशय असामान्य आहे. तो जगातील महान स्लिप क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. मी आधी कोहलीवर टीका केली होती आणि आता स्मिथदेखील तसाच वागत आहे.” याआधी पहिल्या दिवशी, वॉने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात दोन झेल सोडल्याबद्दल स्मिथवर आणि पीटर हँड्सकॉम्बला अतिरिक्त जीवदान दिल्याबद्दल कोहलीवर टीका केली होती.

हेही वाचा: IND vs AUS: फिरकीचीच फिरकी! रोहितची मुलाखत घ्यायला गेला अन् अ‍ॅश अण्णाच झाला क्लीन बोल्ड, पाहा Video

वॉ कॉमेंट्री करताना म्हणाला होता, “हे असे आहे की चेंडू त्याच्याकडे येईल असे त्याला वाटत नव्हते, तो खेळापासून दूर असल्यासारखं दिसतो. मैदानावर असताना तुम्ही सतर्क राहायला हवे. जेव्हा तुम्ही स्पिनर्सना पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात फलंदाजी करत असल्याचे भासवायचे असते. त्वरीत हालचाल करण्यास सक्षम होण्यासाठी तुमचे पाय खूप जवळ असले पाहिजेत. कोहली त्याच्या जागेवर खूप वर होता. थोडं खाली राहायला हवं होतं. त्याने थोडे चांगले करायला हवे होते. जवळजवळ चेंडू त्याच्याकडे येईल अशी त्याला अपेक्षाच नव्हती,”

Story img Loader