मार्लन सॉम्युएल्स आणि डॉरेन ब्राव्हो यांनी तिसऱया विकेटसाठी रचलेल्या 198 धावांच्या अभेद्य भागीदारीमुळे वेस्ट इंडिजने दुसऱया कसोटी सामन्यात बांगलादेशला चोख प्रत्युत्तर दिले आहे.वेस्ट इंडिजने दुसऱया दिवसअखेर 2 बाद 241 धावांची मजल मारली असली तरी ते अद्याप 146 धावांनी पिछाडीवर आहेत.खुलनाच्या धीम्या गतीच्या खेळपट्टीवर सॉम्युएल्स आणि ब्राव्हो यांनी ठाण मांडत बांगलादेशच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही.सॉम्युएल्सने नाबाद 109 धावांची खेळी करत या मोसमातील तिसरे शतक झळकावले.ब्राव्हो सात चौकारांसह 87 धावांवर खेळत आहे.

Story img Loader