Marnus Labuschagne getting angry after being insulted by an England fan: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळला जात आहे. लंडन येथे खेळला जात असलेला हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या खडतर स्पर्धेच्या काळात दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमींमध्येही उत्साह संचारला आहे. त्यानंतर मैदानावर अनेकवेळा क्रिकेटपटू आणि चाहत्यांमध्ये वादाचे प्रसंगही समोर येतात. लंडनच्या ओव्हल ग्राऊंडवर खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटीदरम्यान असेच काहीसे पाहायला मिळाले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इंग्लडच्या चाहत्याने ऑस्ट्रेलिया संघाला डिवचले –
तिसर्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ मैदानातून ड्रेसिंग रुमकडे परत येत असताना इंग्लंडच्या एका चाहत्याने ऑस्ट्रेलियन खेळाडूंसमोर मुद्दाम ओरडण्यास सुरुवात केली. काही ना काही बोलून त्याने खेळाडूंना चिडवायला सुरुवात केली. दरम्यान, जेव्हा उस्मान ख्वाजा आणि मार्नस लाबुशेन ड्रेसिंग परतत होते, तेव्हा इंग्लंडच्या चाहत्याने त्यांना बोरिंग म्हणून चिडवले. त्यावर मार्नस लाबुशेन चांगलाच भडकला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
मार्नस लाबुशेन इंग्लडच्या चाहत्यावर संतापला –
व्हिडीओमध्ये असे दिसून आले की लाबुशेन आणि ख्वाजा ड्रेसिंग रूमच्या दिशेने चालू लागताच एका चाहत्याने त्यांना ‘बोरिंग’ म्हणत चिडवायला सुरुवात केली. ज्यावर लाबुशेन ताबडतोब मागे वळून शिट्टी वाजवून विचारू लागला काय म्हणालास? यानंतर ख्वाजाने त्या चाहत्याला शांत राहण्यास सांगितले. त्यानंतर फॅनने लाबुशेनची माफी मागितली, पण त्याचा राग शमला नाही. लाबुशेन पुढे म्हणाला, तुम्ही हे सर्वांसाठी करणार आहात. यानंतर ख्वाजाने लाबुशेन पकडून तेथून नेले. तरीही या चाहत्याचे डिवचने कमी झाले नाही. त्यानंतर आलेल्या खेळाडूंनाही त्याने अशाच प्रकारे चिडवले.
हेही वाचा – Virat Kohli: बार्बाडोसमध्ये एका चाहत्याने विराट कोहलीला दिली खास भेटवस्तू VIDEO होतोय व्हायरल
चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ मजबूत स्थितीत –
सामन्याबद्दल बोलायचे, तर इंग्लडचा दुसरा डाव ३९५ धावांवर आटोपला. त्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियासमोर ३८४ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी या लक्ष्याचा पाठलाग करताना पावसाने खेळ थांबण्यापूर्वी एकही विकेट न गमावता ३८ षटकानंतर १३५ धावा केल्या आहेत. आता त्यांना विजयासाठी 249 धावांची गरज आहे. डेव्हिड वॉर्नर ५८ आणि उस्मान ख्वाजा ६९ धावा करत खेळत आहे. सध्या पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ कसा पुनरागमन करतो, हे पाहावे लागेल.