Marnus Labuschagne one Handed Catch Video: मार्नस लबुशेनला २०२४ च्या टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळालेले नाही. असे असूनही तो चर्चेत आहे. सध्या तो इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-२० ब्लास्टमध्ये सहभागी झाला आहे. या सामन्यात त्याने एका हाताने असा काही भन्नाट झेल टिपला आहे जो पाहून सर्वच जण आश्चर्यचकित झाले आहेत.
ग्लॅमॉर्गन आणि ग्लॉस्टरशायर यांच्यात लीग सामना खेळवला गेला होता. सामन्यादरम्यान, ग्लुसेस्टरशायरचा फलंदाज बेन चार्ल्सवर्थने मेसन क्रेनविरुद्ध जोरदार फटका लगावला. परंतु लाँग ऑनच्या दिशेने तैनात असलेल्या लबुशेनने त्याचा आश्चर्यकारक झेल घेतला, व्हीडिओ पाहताना सुरूवातीला कोणाला कळलंच नाही की त्याने झेल टिपला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवरही या क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये २९ वर्षीय मार्नस लबुशेन विरोधी फलंदाज चार्ल्सवर्थचा झेल टिपण्यासाठी बरंच अंतरावर धावत असल्याचे दिसत आहे. एवढेच नाही तर तो झेल पकडण्यासाठीतो धावत वेळेत पोहोचणार नाही असे वाटताच त्याने हवेत झेप घेतली. हा क्षण पाहून लोक क्षणभर आश्चर्यचकित झाले आणि पुढच्याच क्षणी चेंडू त्याच्या हातात होता आणि ग्लॅमॉर्गनचे खेळाडू आनंद साजरा करत होते.
Marnus Labuschagneeeeeeeeeeeeeeeeeee pic.twitter.com/b5J7dpetk5
— Glamorgan Cricket ? (@GlamCricket) June 20, 2024
हेही वाचा – IND vs AFG सामन्यात भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून का उतरला? BCCI ने सांगितलं नेमकं कारण
मार्नस लबुशेनच्या नेतृत्वाखालील ग्लॅमॉर्गन संघाला या सामन्यात शेवटच्या चेंडूवर पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात ग्लॅमॉर्गन संघाने निर्धारित षटकांत ६ गडी गमावून १४० धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना ग्लॉसेस्टरशायर संघाने शेवटच्या चेंडूवर ८ गडी गमावून १४१ धावांचे लक्ष्य गाठले. जॅक टेलरने संघासाठी ७० धावांचे उत्कृष्ट अर्धशतक झळकावले.