भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नागपुरात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिला सामना खेळला जात आहे. या सामन्याच्यापहिल्या दिवशी पाहुणा कांगारू संघ अवघ्या १७७ धावांत गारद झाला. ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा मार्नस लॅबुशेन होता, ज्याने ४९ धावा केल्या. यादरम्यान त्याने असे अनेक शॉट्स खेळले, जे तो सहसा कसोटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसत नाही. यामागचे कारण होते विराट कोहली, असा खुलासा मार्नस लाबुशेनने केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्याच्या पहिल्या दिवसानंतर, मार्नस लाबुशेनने सेनशी बोलताना खुलासा केला आहे, की नागपूर कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने विराट कोहलीकडून शिकलेले काही शॉटस खेळले. मार्नस लाबुशेन म्हणाला, “आज मी काही शॉट्स खेळलो, जे निश्चितच विराट कोहलीकडून शिकलो आहे. हे नेहमीच चांगले असते की, जेव्हा कोहलीला वाटते की तुम्ही चांगले शॉट खेळले.” कोहलीने मार्नसच्या कव्हर ड्राईव्हदेखील कौतुक केले होते.

मार्नस लबुशेन हा सध्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचा एक महत्त्वाचा भाग म्हणता येईल. तो आणि स्टीव्ह स्मिथ हे दोन ऑस्ट्रेलियन फलंदाज आहेत, जे सामना विरोधी संघापासून दूर नेण्याचे काम करतात. दोन्ही फलंदाज एकाच शैलीचे आहेत, जे धावफलक हलता ठेवताना गोलंदाजांना घाम फोडतात. या सामन्यातही त्यानी एक भागीदारी केली, जी रवींद्र जडेजाने आपल्या धोकादायक गोलंदाजीने मोडून काढली.

सामन्याबद्दल बोलायचे तर, सामन्याचा पहिला दिवस टीम इंडियाच्या नावावर राहिला. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १७७ धावांत गुंडाळला. ज्यामध्ये रवींद्र जडेजाने पुनरागमनानंतर पहिल्याच शानदार गोलंदाजी केली. त्याने सर्वाधिक पाच विकेट्स घेतल्या. तसेच आर आश्विनने देखील ३ विकेट्स घेतल्या आहेत.त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज खेळी करत पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत संघाला ७७ धावांपर्यंत नेले आहे. केएल राहुल २० धावा करून बाद झाला. रोहित शर्मा ५६ धावांवर नाबाद आहे.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: पाच विकेट घेतल्यानंतर जडेजाचा खेळपट्टीबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, ‘रिदम होता आणि… ‘

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लायन, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marnus labuschagne said after ind vs aus 1st test the first day that he had learned some shots from virat kohli vbm
Show comments