Marnus Labuschagne raised questions on India vs Australia T20 series : काही दिवसापूर्वीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. आता दोन्ही संघांमध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. गुरुवारी या मालिकेतील पहिला टी-२० सामना खेळवला जाणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्नस लाबुशेनने विश्वचषकानंतर लगेचच भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. मार्नस लाबुशेन म्हणाला की, आता दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका खेळवली जाईल. हे खूप आश्चर्यकारक आहे, हे समजणे कठीण आहे. तथापि, हे वेळापत्रकाचे स्वरूप आहे, सध्याचे क्रिकेटचे स्वरूप आहे.
मार्नस लॅबुशेनने टी-२० मालिकेवर उपस्थित केले प्रश्न –
१९ नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना खेळला गेला होता. त्यानंतर आता दोन्ही देशांमध्ये टी-20 मालिका होणार आहे. याविषयी मार्नस लॅबुशेन म्हणाला, “आता दोन्ही देशांदरम्यान टी-२० मालिका खेळवली जाईल, हे खूप आश्चर्यकारक आहे. हे जरी वेळापत्रकाचे स्वरूप असले, तरी ते समजणे थोडे कठीण आहे.” टी-२० मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाला पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघातील प्रमुख वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर आणि मार्नस लाबुशेनसारखे खेळाडू या मालिकेतून बाहेर आहेत. त्याचबरोबर भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. दोन्ही संघांना त्यांच्या युवा खेळाडूंची चाचणी घेण्यासाठी ही टी-२० मालिका खूप खास आहे. कारण २०२३ साली टी-२० विश्वचषक होणार आहे, ज्यासाठी दोन्ही देशांना आपला सर्वोत्तम संघ तयार करायचा आहे.
पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी दोन्ही देशांचे संघ
भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), अॅरॉन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, शॉन अॅबॉट, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा.