Marnus Labuschagne Field Setting Video Viral: ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मार्नस लबुशेन हा ऑस्ट्रेलियाच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शेफिल्ड शील्डचा कर्णधार आहे. यातील क्वीन्सलँड संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या या टूर्नामेंटमध्ये क्वीन्सलँड वि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या सामन्यात मार्नस लबुशेन गोलंदाजी करत होता. पण गोलंदाजी करताना त्याने ज्यापद्धतीची फिल्ड सेट केली होती, ते पाहून सगळेच अवाक् झाले.

पर्थ येथे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना क्वीन्सलँड संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डावाच्या सुरुवातीला कॅमेरून बॅनक्रॉफ्टची विकेट पडल्यानंतरही यजमान संघाने पहिल्या दिवशी ३१९ धावा केल्या. सॅम व्हाईटमन आणि जोश इंग्लिस यांच्यातील भागीदारी तोडण्यासाठी लबुशेनने ६४वे षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या स्पेल दरम्यान, त्याने अंपायरच्या मागे फिल्डरला उभं करत सर्वांना आश्चर्यचकित केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा – Rohit Sharma: रोहित शर्माने चाहतीच्या वाढदिवसाचा आनंद केला द्विगुणित; दिली खास भेट; VIDEO व्हायरल

गोलंदाजी करत असताना लबुशेनने आपल्या एका खेळाडूला त्याच्या शेजारी उभे राहण्यास सांगितले. म्हणजेच क्षेत्ररक्षकाला अंपायरच्या मागे उभं केलं. यानंतर मार्नसने क्षेत्ररक्षकाला डावीकडे खेचले आणि नंतर इंग्लिसला बाउन्सर टाकला. हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले. लोक त्याची तुलना स्ट्रीट क्रिकेटशी करू लागले. लबुशेनने तीन षटकं टाकली आणि फक्त २ धावा दिल्या. पण त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

हेही वाचा – IND-W vs SL-W: स्मृती मानधनाच्या बॅटमधून भारताचा टी-२० वर्ल्डकपमधील पहिला षटकार, पॉवरप्लेमध्ये केल्या इतक्या धावा

व्यावसायिक क्रिकेटमध्ये लबुशेनने सेट केलेली फिल्ड आपण क्वचितच कधी पाहिली असेल की गोलंदाज रन अप घेतो, तिथे अंपायरच्या मागे एखादा फिल्डर उभा असेल. वेगवान गोलंदाजी करताना लबुशेनने अनेक बाऊन्सर टाकले. मार्नस लबुशेनने दुसऱ्या षटकातील अखेरचा चेंडू टाकत असताना त्याने एका फिल्डरला बोलावून अंपायरच्या बरोबर मागे उभे केले. पण अंपायरने सांगताच त्याने फिल्डरला थोडं बाजूला उभं केलं.

हेही वाचा – IND-W vs SL-W: स्मृती मानधनाच्या बॅटमधून भारताचा टी-२० वर्ल्डकपमधील पहिला षटकार, पॉवरप्लेमध्ये केल्या इतक्या धावा

पहिल्या दिवशी लबुशेनच्या तीन षटकांच्या स्पेलमध्ये दोन मेडन्स टाकल्या. व्हाइटमन आणि इंग्लिस यांच्या शतकांमुळे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने दिवसाच्या अखेरपर्यंत ३१९ धावांवर केल्या, मॅट रेनशॉने इंग्लिसला १२२ धावांवर बाद करण्यापूर्वी २०३ धावांची भागीदारी केली. त्यानंतर २३७ चेंडूत १०२ धावा करून व्हाईटमन बाद झाला. दुसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना लबुशेनने अर्धशतकाच्या मार्गावर असलेल्या कॅमेरॉन गॅननची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.