प्रो-कबड्डीच्या माध्यमातून कबड्डीला सातासमुद्रापार नेण्यात महत्वाचा वाटा असलेल्या Marshal Sports Pvt. Ltd या कंपनीने प्रो-कबड्डीच्या सहाव्या आणि सातव्या हंगामाची घोषणा केली आहे. या दोनही हंगामात ही स्पर्धा १३ आठवडे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रो-कबड्डीचा सहावा हंगाम १९ ऑक्टोबर २०१८ रोजी तर सातवा हंगाम १९ जुलै २०१९ रोजी पार पडणार आहे.

पाचव्या हंगामात प्रो-कबड्डीचा कालावधी वाढवून ३ महिने करण्यात आला. सुरुवातीला यावरुन प्रेक्षक कबड्डीला पसंती देतील का अशी शंका अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र पाचव्या हंगामात प्रो-कबड्डीने क्रिकेटला कडवी टक्कर देत भारतीय प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान कायम राखलं. पाचव्या हंगामात पटणा पायरेट्स विरुद्ध गुजरात फॉर्च्युनजाएंट यांच्यात झालेल्या सामन्यात पाटण्याने बाजी मारली होती.

Story img Loader