भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना गुरुवारपासून सुरु झाला. या सामन्यात भारताने पहिल्या दिवशी द्विशतकी मजल मारत सामन्यावर पकड मिळवली आणि नवीन वर्षाची सुरुवात चांगली केली. पण रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्यासाठी नवीन वर्षी एक निराशादायक बाब घडली आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यात मार्टिन गप्टिल याने या दोघांचा विक्रम मोडला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मार्टिन गप्टिल याने श्रीलंकेविरुद्दच्या सामन्यात शतक लगावले आणि एकदिवसीय कारकिर्दीतील ६ हजार धावांचा टप्पा ओलांडला. १६० सामन्यांमध्ये त्याने हा टप्पा गाठला. याबरोबर त्याने रोहित शर्मा आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडला. रोहितने हा टप्पा गाठण्यासाठी १६२ तर धोनीने १६६ सामने खेळले होते.

दरम्यान, गप्टिल सर्वात जलद ६ हजार धावा गाठणाऱ्यांच्या यादीत ८वा फलंदाज ठरला. या यादीत १२३ सामन्यात हा टप्पा गाठणारा आफ्रिकेचा हाशिम आमला अव्वल आहे. तर विराटने ६ हजार धावांचा टप्पा गाठण्यास १३६ सामने खेळले होते.