न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज मार्टिन गप्टिलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली आहे. २००९ मध्ये आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणारा मार्टिन गप्टिल गेल्या दोन वर्षांपासून न्यूझीलंड संघाचा भाग नव्हता. मार्टिन गप्टिल न्यूझीलंडकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. यासह त्याची १४ वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपुष्टात आली आहे. यादरम्यान त्याने न्यूझीलंड संघासाठी अनेक मोठे विक्रम केले. मात्र तरीही तो टी-२० लीग क्रिकेटमध्ये खेळत राहणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मार्टिन गप्टिल हा न्यूझीलंडसाठी टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. याशिवाय एकदिवसीय विश्वचषकात द्विशतक झळकावण्याचा पराक्रमही त्याने केला आहे. २०१५ च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याने हे द्विशतक झळकावले होते. निवृत्तीची घोषणा करताना मार्टिन गप्टिल म्हणाला, ‘लहानपणी न्यूझीलंडसाठी खेळणं हे माझे नेहमीच स्वप्न होतं आणि मी माझ्या देशासाठी ३६७ सामने खेळलो याचा मला अभिमान वाटतो.’
पुढे गप्टिल म्हणाला, मी राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून क्रिकेट खेळताना महान क्रिकेटपटूंच्या समुहाबरोबर संघाची जर्सी घालून खेळतानाच्या आठवणी मी नेहमी जपत राहीन. मी माझे सर्व सहकारी आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांचे, विशेषत: मार्क ओ’डोनेल यांचे खूप आभार मानू इच्छितो. ज्यांनी मला १९ वर्षांखालील स्तरापासून प्रशिक्षण दिले आहे आणि माझ्या संपूर्ण कारकिर्दीत सतत पाठिंबा देत कायम शिकवण देत राहिले. माझे मॅनेजर लीन मॅकगोल्डरिक यांचेही विशेष आभार, पडद्यामागील सर्व काम कधीच दुर्लक्षित झाली नाहीत आणि तुमच्या पाठिंब्यासाठी मी नेहमीच ऋणी राहीन. गप्टिलने चाहत्यांचेही आभार मानले.
हेही वाचा – पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीची हौस भारी; पण स्टेडियम्स बांधून तयारच नाही, यजमानपद दुबईकडे जाण्याची शक्यता
मार्टिन गप्टिलने २००९ मध्ये न्यूझीलंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पदार्पणातच शतक झळकावले. त्याच्या पहिल्याच सामन्यात त्याने दाखवून दिले होते की तो एक जबरदस्त खेळाडू आहे. २००९ मध्येच त्याने कसोटी आणि टी-२० मध्ये पदार्पण केले. आपल्या दमदार फलंदाजीच्या जोरावर त्याने किवी संघात आपले कायमचे स्थान निर्माण केले. यानंतर २०१५ च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये त्याने द्विशतक झळकावले. त्याच्या नावावर ४७ कसोटी सामन्यांमध्ये २५८६ धावा, १९८ एकदिवसीय सामन्यांमध्ये ७३४६ धावा आणि १२२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३५३१ धावा आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर एकूण २३ शतकं आहेत.
हेही वाचा – विराट कोहलीबरोबर धक्काबुक्कीनंतर मैदानाबाहेर भेटल्यावर नेमकी चर्चा झाली? कॉन्स्टासने स्वत: सांगितलं
भारताच्या वर्ल्डकप विजयाचा घास हिरावणारा खेळाडू
२०१९ च्या वर्ल्डकपचा उपांत्य फेरीचा सामना भारतीय चाहत्यांसाठी एक कटू आठवण ठरला. ओल्ड ट्रॅफर्डच्या क्रिकेट मैदानावर न्यूझीलंड वि भारत यांच्यात हा सामना खेळवला गेला. किवी संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत आठ गडी गमावून २३९ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात नक्कीच खराब झाली. पण खालच्या फळीत धोनी (५०) आणि जडेजा (७०) यांनी चांगली फलंदाजी करत सामन्याचा रोख बदलला. पण गप्टिलच्या अचूक थ्रोमुळे टीम इंडियाच्या हातून विजय हिसकावला. त्याने सर्वात मोठा फिनिशर धोनीला धावबाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतर हा सामनाही टीम इंडियाच्या हातातून गेला.