ऑलिम्पिक पात्रता स्पर्धासाठी भरवण्यात आलेल्या राष्ट्रीय शिबिरांमध्ये पाच वेळ विश्वविजेत्या ठरलेल्या मेरी कोमला बंदी घातली असल्याच्या वावडय़ा उठल्या होत्या. बॉक्सिंग इंडियाने हे वृत्त निराधार असल्याचे सांगितले आहे. मेरीवर राष्ट्रीय शिबिरामध्ये येण्याची सक्ती करण्यात आलेली नाही, तिला स्वतंत्र सरावाची अनुमती देण्यात आल्याची माहिती या वेळी बॉक्सिंग इंडियाने दिली आहे. बॉक्सिंग इंडियाचे सहसचिव जय कवळी यांनी काही दिवसांपूर्वी मेरीने राष्ट्रीय शिबिरावर बंदी घातली होती, असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याबाबत त्यांनी सांगितले की, ‘‘मेरी कोमने राष्ट्रीय शिबिरावर बंदी घातली असल्याचे मी कधीही म्हटले नव्हते. ती शिबिराला उपस्थित राहात नसल्याचे मी म्हटले होते. अव्वल बॉक्सिंगपटूंना  स्वतंत्र सराव करण्याची अनुमती देण्यात येते आणि मेरीच्या बाबतीतही तेच घडले आहे. जिथे मेरीला योग्य वाटेल तिथे ती सराव करू शकते.’’