ग्लास्गो येथे २३ जुलैपासून होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या भारतीय बॉक्सिंग संघातून पाच वेळा विश्वविजेती ठरलेल्या एम. सी. मेरी कोम हिला वगळण्यात आले आहे. तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर बॉक्सिंग रिंगमध्ये पुनरागमन करणाऱ्या मेरी कोमला पतियाळा येथे नुकत्याच झालेल्या सराव शिबिरात अंतिम फेरीत पिंकी जांगरा (५१ किलो) हिने पराभूत केले होते. ‘‘ही लढत अटीतटीची झाली. आता राष्ट्रकुल स्पर्धेत पिंकीने पदक जिंकावे, यासाठी मी तिला शुभेच्छा देते,’’ असे मेरी कोम हिने सांगितले.

Story img Loader