प्रतिकूल परिस्थितीतही बॉक्सिंगचा ध्यास जपत आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवास्पद प्रदर्शन करणारी भारताची अव्वल महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमने रिओ ऑलिम्पिकनंतर निवृत होण्याचे संकेत दिले आहेत. ‘‘निवृत्तीबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. मात्र रिओ ऑलिम्पिकनंतर मी निवृत्त होऊ शकते. सराव अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यावरच माझा भर आहे. देशासाठी जास्तीतजास्त पदके पटकावण्यासाठी सर्वोत्तम सराव होणे गरजेचे आहे,’’ असे मेरीने सांगितले. रिओ ऑलिम्पिकच्या तयारीविषयी विचारले असता मेरी म्हणाली, ‘‘यंदाच्या वर्षांत कोणतीही मोठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा नाही. त्यामुळे काही निमंत्रितांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळणार आहे. अशा सामन्यांमुळे मोठय़ा स्पर्धाची तयारी होऊ शकते, तंदुरुस्तीचा अंदाज येतो.’’ ती पुढे म्हणाली, ‘‘पूर्वाचलातील राज्यांमध्ये अनेक गुणवान खेळाडू आहेत. मात्र त्यांच्या कामगिरीत अजून सुधारणेची आवश्यकता आहे, जेणेकरून ते देशासाठी पदके जिंकू शकतील.’’
संग्रहित लेख, दिनांक 13th Jan 2015 रोजी प्रकाशित
रिओ ऑलिम्पिक नंतर निवृत्तीचे मेरी कोमचे संकेत
प्रतिकूल परिस्थितीतही बॉक्सिंगचा ध्यास जपत आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवास्पद प्रदर्शन करणारी भारताची अव्वल महिला बॉक्सिंगपटू मेरी कोमने रिओ ऑलिम्पिकनंतर निवृत होण्याचे संकेत दिले आहेत.
First published on: 13-01-2015 at 02:37 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mary kom hints at retirement after 2016 olympics