टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताची महिला बॉक्सर मेरी कोमच्या पराभवानंतर तिच्या एका चाहतीला अश्रू अनावर झाले होते. याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर आता मेरी कोमने आपल्या या चाहतीची भेट घेतली आहे. कोलंबियाच्या इंग्रीट व्हॅलेन्सिया विरुद्ध पराभव झाल्यानंतर मेरी कोमला टोक्यो ऑलिम्पिकमधून बाहेर पडावं लागलं होतं. तिच्या पराभवानंतर रडणाऱ्या एका मुलीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. मेरी कोमने स्वतः हा व्हिडीओ शेअर केला होता.

मेरीने स्वतः शेअर केला होता ‘तो’ व्हिडीओ

टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये मेरी कोम हिला महिलांच्या ५१ किलो गटात कोलंबियन बॉक्सरकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आपल्या चाहतीचा व्हिडिओ शेअर करताना मेरी कोमने हिने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मेरी कोमने हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे कि, “प्रिय बहिणींनो, मला तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली तर मी तुम्हाला मिठी मारेन आणि सलाम करेन. जर तुम्हाला कोणत्याही खेळात/बॉक्सिंगमध्ये रस असेल तर मला तुम्हाला मदत करण्यात खूप आनंद होईल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by MC Mary Kom OLY (@mcmary.kom)

‘ती’ माझ्यासाठी मनापासून हसली आणि रडलीसुद्धा!

विशेष म्हणजे मेरी कोमने आपला शब्द पाळत आपल्या चाहतीला शोधून काढलं आणि ती तिला जाऊन भेटली. इतकंच नव्हे तर ट्विटरवर आपल्या तिच्यासोबतच्या भेटीचा फोटो पोस्ट केला. “मला बॉक्सिंगसाठी माझी नवीन चाहती आणि फॉलोवर सापडली आहे. ही माझी चाहती टोक्यो ऑलिम्पिक २०२० मध्ये माझ्यासाठी मनापासून आनंदी झाली आणि रडलीसुद्धा,” असे मेरीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मेरी कोमने केलेल्या या पोस्टचं ट्विटरवर अनेक युझर्सनी प्रचंड कौतुक केलं आहे. नेटिझन्सनी मेरी कोम आणि तिच्या चाहतीच्या या भेटीबद्दल प्रचंड आनंद व्यक्त केला आहे. मेरी कोम ही खऱ्या अर्थाने मोठी आहे. आम्हाला तिचा खरंच खूप अभिमान वाटतो असे अनेक अनेकांनी म्हटलं आहे.

Story img Loader