पाच वेळा जागतिक अजिंक्यपद पटकावणाऱ्या भारताच्या एम सी मेरी कोमने एआयबीए जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्यपद स्पध्रेत धडाक्यात सुरुवात केली. मेरी कोमने ५१ किलो वजनी गटात स्वीडनच्या जुलियाना सोडरस्ट्रॉमवर ३-० असा दणदणीत विजय मिळवून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पुढील फेरीत तिच्यासमोर जर्मनीच्या अ‍ॅझीझे निमानीचे आव्हान आहे. निमानीने आशियाई स्पध्रेत कांस्यपदक जिंकणाऱ्या मंगोलियाच्या नँडीत्सेंत्सेग मायागमार्डुलमचा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली.
मेरी कोमने तुलनेने उंच असलेल्या सोडरस्ट्रॉमवर सुरुवातीपासून आक्रमण केले. स्पध्रेच्या पाश्र्वभूमीवर आपल्या क्रियेत कमालीची सुधारणा करत ३२ वर्षीय मेरी कोमने दमदार खेळ केला. आशियाई स्पध्रेतील सुवर्णपदक विजेती मेरी कोम सहाव्या जागतिक अजिंक्यपद पटकावण्याबरोबर ऑलिम्पिक पात्रता मिळवण्याच्या निर्धाराने या स्पध्रेत सहभागी झाली आहे.
सरिता देवीने बेलारुसच्या अ‍ॅला यार्शेव्हिचवर ३-० असा विजय मिळवला. पुढच्या फेरीत सरितासमोर मेक्सिकोच्या व्हिक्टोरिया टोरेसचे आव्हान असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mary kom sails into rd 2 of world championships