चार वर्षांपूर्वी कांस्यपदकावर समाधान मानणाऱ्या पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या मेरी कोमने या वेळी मात्र आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचे ध्येय बाळगले आहे. ‘‘आतापर्यंत माझी या स्पर्धेसाठीची तयारी चांगली झाली असल्यामुळे मी स्पर्धा सुरू होण्याची वाट पाहत आहे. या वेळी मी कांस्यपदकावर समाधानी नाही. सुवर्णपदकाची ‘पंच’ लगावण्यासाठी मी उत्सुक आहे. सध्याच्या घडीला स्त्रिया कमजोर झाल्याचे दिसू लागले आहे. स्त्रियांनी स्वत:च शक्तिमान बनायला हवे. त्यासाठी बॉक्सिंग हा चांगला पर्याय आहे,’’ असे एका युवा सराव केंद्राचे अनावरण करताना मेरी कोमने सांगितले.

Story img Loader