Sachin Tendulkar’s disclosure about hid retirement : सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव म्हटले जाते. सचिनने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १०० शतके ठोकली आहेत. फार कमी लोकांना माहित असेल की सचिन तेंडुलकरला त्याच्या यशस्वी कारकिर्दीच्या मध्यावर क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायची होती. असे जर झाले असते, तर सचिन तेंडुलकर आपल्याला २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळताना दिसला नसता. त्याचबरोबर भारतीय संघाला विश्वचषक जिंकून देण्याचे सचिन तेंडुलकरचे स्वप्न पूर्ण झाले नसते. पण मास्टर ब्लास्टरने २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली आणि त्याचे स्वप्न पूर्ण झाले.
चाहत्यांनी भारतीय खेळाडूंचे जाळले होते पुतळे –
२००७ च्या विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग आणि राहुल द्रविड यांसारख्या महान फलंदाजांचा समावेश होता, परंतु टीम इंडिया बांगलादेश आणि श्रीलंकेकडून पराभूत झाल्याने पहिल्याच फेरीतूनच बाहेर पडली. यानंतर टीम इंडिया जेव्हा भारतात परतली, तेव्हा चाहत्यांनी या खेळाडूंचे पुतळे जाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर सचिन तेंडुलकर एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत होता.
सचिन तेंडुलकर २००७ मध्येच निवृत्त होणार होता –
एकदिवसीय विश्वचषक २००७ च्या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवामुळे दु:खी झालेला सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होता. खुद्द सचिनने त्याच्या ‘प्लेइंग इट माय वे’ या आत्मचरित्रात याचा खुलासा केला आहे. सचिनने खुलासा केला की त्याचा मूड खूप खराब होता आणि क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होता, पण एका व्यक्तीने त्याला असे करण्यापासून रोखले. त्यावेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ३४ वर्षांचा होता.
हेही वाचा – T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानने उडवला युगांडाचा धुव्वा; ५ विकेट्ससह फारुकी चमकला
या व्यक्तीने सचिनला निवृत्ती घेण्यासापासून रोखले –
ज्या व्यक्तीने सचिन तेंडुलकरला लवकर निवृत्ती घेण्यापासून रोखले, ते दुसरे कोणीही नसून वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज सर व्हिव रिचर्ड्स होते. सचिनने सांगितले की, “व्हिव रिचर्ड्सने मला वेस्ट इंडिजमधून फोन केला आणि आम्ही सुमारे ४५ मिनिटे बोललो. तो म्हणाला की माझ्यात अजून खूप क्रिकेट शिल्लक आहे. त्यामुळे मी निवृत्ती घेण्याचा विचारही करू नये.”
हेही वाचा – T20 Blast 2024 : पाकिस्तानच्या हसन अलीला विकेटनंतर ‘जनरेटर’ सेलिब्रेशन करणे पडले महागात, VIDEO होतोय व्हायरल
सचिन तेंडुलकर व्हिवला आपला आदर्श मानतो –
सचिन तेंडुलकरने आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, “मी मोठा होत असताना व्हिव माझा हिरो होता आणि कायम राहील. तो माझ्याशी लहान भावासारखा वागतो. त्यामुळे जेव्हा त्याने मला फोन करुन खेळत राहण्यास सांगितले, त्याचे हे शब्द माझ्यासाठी खूप मोलाचे ठरले. यानंतर मी खेळत राहिलो आणि २००८ मध्ये सिडनीमध्ये शतक झळकावून फॉर्ममध्ये परतलो.” सचिनने आपल्या कारकिर्दीत वनडेमध्ये १८,४२६ आणि कसोटीत १५,९२१ धावा केल्या आहेत.