क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर अशी ओळख असणाऱ्या सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकरचा जन्म २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. सचिन आज त्याचा ५० वा वाझदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अनेक चाहते त्याला शुभेच्छा देताना दिसत आहे. नुकतंच सचिनने त्याच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केली आहे.
सचिन तेंडुलकर हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. तो ट्वीटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. सचिनने त्याच्या वाढदिवसानिमित्त खास फोटो शेअर केला आहे. याच्या कॅप्शनने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.
आणखी वाचा : Sachin Tendulkar Birthday: ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान!’ सचिन, सचिन… साडेपाच फुटाचा मुलगा कसा बनला ‘क्रिकेटचा देव’, जाणून घ्या
सचिन हा त्याच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने कुटुंबासह गोव्यात गेला आहे. नुकतंच सचिनने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तो स्विमिंगपूलमध्ये पाय टाकून चहा पिताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत सचिन हा पाठमोरा बसला आहे. त्याबरोबर तो निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना दिसत आहे.
या फोटोला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. ‘टी टाईम : ५० नॉट आऊट!’, असे सचिनने या फोटोला कॅप्शन दिले आहे. त्याच्या या फोटोवर अनेक चाहते कमेंट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : “माझी कोणीही क्रश नाही, पण कोकण हार्टेड गर्लचा…”, ओंकार भोजनेचा खुलासा
क्रिकेटच्या इतिहासात सचिन तेंडुलकरची गणना जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०,००० हून अधिक धावा (३४,३५७) करणारा सचिन हा एकमेव क्रिकेटर आहे. त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये १५,९२१ धावा आहेत. सर्वाधिक कसोटी शतके (५१) आणि सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा (२००) विक्रम त्याच्या नावावर आहे. या फॉरमॅटमध्ये त्याच्याकडे सर्वाधिक चौकार (२०५८) आहेत आणि तो सर्वात जलद १५,००० कसोटी धावा करणारा फलंदाज आहे.
भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘भारतरत्न’ हा सन्मान प्राप्त होणारा तो पहिला खेळाडू आणि सर्वात तरुण व्यक्ती आहे. राजीव गांधींच्या नावे ‘खेलरत्न’ पुरस्काराने सन्मानित होणारा हा पहिला क्रिकेटपटू आहे. २००८ मध्ये त्याला पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.