भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मास्टरकार्डसोबत शीर्षक प्रायोजकत्वासाठी करार केला आहे. त्यामुळे येत्या सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या मालिकेपासून भारतीय संघाचा शीर्षक प्रायोजक पेटीएमऐवजी मास्टरकार्ड असेल. विशेष म्हणजे, पेटीएमने स्वत: आपले सर्व अधिकार मास्टरकार्डला देण्याची विनंती बीसीसीआय केली होती होती. पेटीएमची ही विनंती बीसीसीआयने मान्य केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०१९ मध्ये, बीसीसीआयने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेट सामन्यांसाठी पेटीएमचे शीर्षक प्रायोजकत्व चार वर्षांसाठी वाढवले होते. त्यासाठी पेटीएमला २०१९ ते २०१३ या काळासाठी ३२६.८० कोटी रुपये बीसीसीआयला देणे होते. २०१९ पासून प्रत्येक सामन्यासाठी पेटीएम ३.८० कोटी रुपये खर्च करत होते. मात्र, आर्थिक अचडणीपोटी पेटीएमने शीर्षक प्रायोजकत्व सोडण्याचा निर्णय घेतला. यासोबतच आपले अधिकार मास्टरकार्डला देण्याची विनंतीही बीसीसीआयकडे केली होती.

बायजूकडे ८६.२१ कोटी रुपयांची थकबाकी

भारतीय संघाच्या जर्सीचे प्रायोजक असलेल्या बायजूचे बीसीसीआयची ८६.२१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या वर्षी एप्रिलमध्ये एज्युटेक कंपनी असलेल्या बायजुने २०२३ मध्ये होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपर्यंत आपला करार वाढवून घेतला आहे. बीसीसीआयने कराराच्या रकमेत १० टक्के वाढ करून मुदत वाढवली होती.

हेही वाचा – Video : रोहित शर्मा अन् ऋषभ पंतसह इतर खेळाडू वेस्ट इंडीजमध्ये दाखल; हॉटेलच्या लॉबीमध्ये रंगला गळाभेटीचा कार्यक्रम

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बायजूच्या प्रवक्त्याने याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, ‘आम्ही बीसीसीआयसोबतचा करार वाढवला आहे. पण, अद्याप त्यावर स्वाक्षरी झालेली नाही. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर अटींनुसार पेमेंट केले जाईल. त्यामुळे आमच्या बाजूने कोणतीही रक्कम थकीत नाही.’