India and Pakistan on October 15 will be played on October 14: एकदिवसीय विश्वचषक २०२३ यावर्षी ५ ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणार आहे. या स्पर्धेचे वेळापत्रक आधीच जाहीर करण्यात आले होते. आता या वेळापत्रकात थोडा बदल केल्याची बातमी समोर येत आहे. हा बदल पाकिस्तानच्या दोन सामन्यांमध्ये झाला असला, तरी याचे मुख्य कारण म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र १५ ऑक्टोबर हा नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने, आता या मोठ्या सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. यासाठी आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला प्रस्ताव दिला होता, ज्यावर त्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आयसीसी स्पर्धेचे अपडेटेड वेळापत्रक लवकरच जाहीर करण्याची शक्यता आहे.

आता या तारखेला खेळला जाईल सामना –

पीटीआयच्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कपचा हाय व्होल्टेज सामना आता अहमदाबादमध्ये १५ ऐवजी १४ ऑक्टोबरला होणार आहे. यासह पीसीबीने त्यांच्या दोन सामन्यांच्या तारखा बदलण्याच्या आयसीसी आणि बीसीसीआयच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली आहे. याशिवाय पाकिस्तान संघ आता १२ ऑक्टोबर ऐवजी १० ऑक्टोबरला हैदराबादमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळेल, जो भारताविरुद्धच्या सामन्याच्या तीन दिवस आधी येईल.

हेही वाचा – IND vs WI 3rd ODI: इशान किशन आणि शुबमन गिलने रचला विक्रम! रहाणे-धवनला ‘या’ बाबतीत टाकले मागे

आयसीसी अपडेटेड वेळापत्रक जारी करेल –

अहवालात असे सांगण्यात आले आहे की, आयसीसी लवकरच नवीन अपडेटेड वेळापत्रक जारी करेल, ज्यामध्ये आणखी काही सामन्यांचे वेळापत्रक देखील बदलले जाईल. सध्या आयसीसीकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. पण रिपोर्टनुसार, भारत-पाकिस्तान आणि पाकिस्तान-श्रीलंका या दोन सामन्यांच्या तारखा बदलू शकतात. १२ तारखेला होणारा श्रीलंका-पाकिस्तान सामना १० तारखेला गेला, तर १० तारखेला होणाऱ्या इंग्लंड-बांगलादेश सामन्याचे वेळापत्रकही बदलू शकते. दुसरीकडे या सामन्याऐवजी १२ तारखेला कोणता सामना होणार हे चित्र आयसीसीच्या अंतिम वेळापत्रकातच स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा – IND vs WI 3rd ODI: विराट कोहलीला चाहते करतायत मिस, स्टेडियममध्ये झळकले पोस्टर

ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार भारताचा पहिला सामना –

भारतीय संघ ८ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकात आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. हा सामना चेन्नईत होणार आहे. यानंतर संघ अफगाणिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. हा सामना ११ ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार आहे. यानंतर संघाला पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. विश्वचषक स्पर्धेला ५ ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार आहे. इंग्लंड गतविजेता आहे. २०१९ मध्ये इंग्लंड न्यूझीलंडला हरवून चॅम्पियन बनले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Match between india and pakistan on october 15 will be played on october 14 in odi wc 2023 vbm
Show comments