लखनऊ : पहिल्या सामन्यात यजमान भारताकडून मिळालेल्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा सामना विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या वेळी सर्वांचे लक्ष ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांकडे असणार आहे. पाच जेतेपदे मिळवणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांना भारताकडून सहा गडी राखून पराभूत व्हावे लागले. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेला १०२ धावांनी नमवले आणि त्याच विश्वासाने ते या सामन्यात उतरतील.

हेही वाचा >>> IND vs AFG: किंग कोहलीने सामन्यादरम्यान लगावले ठुमके! विराटच्या डान्सचा Video सोशल मीडियावर होतोय तुफान व्हायरल

NZ vs SL Sri Lanka beat New Zealand by 140 runs Mark Chapman 82 runs in 3rd ODI match at Eden Park
NZ vs SL : तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने उडवला न्यूझीलंडचा धुव्वा, मार्क चॅपमनची खेळी ठरली व्यर्थ
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Loksatta anvyarth Gautam Gambhir India lose in Test series
अन्वयार्थ: खरेच ‘गंभीर’ आहोत?
Pat Cummins becomes first bowler toTake record 200 WTC wickets in History IND vs AUS Sydney
IND vs AUS: पॅट कमिन्सचा वर्ल्ड रेकॉर्ड, WTC च्या इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच गोलंदाज
India Disqualified From WTC Final After Defeating in Border Gavaskar Trophy Australia vs South Africa
WTC Final: भारत WTC फायनलसाठी ‘नापास’; वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही; ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिकेत रंगणार अंतिम सामना
IND v AUS Australia wins BGT 2025 after 10 years against India
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाने १० वर्षांनी भारताला नमवत जिंकली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, WTC फायनलमध्ये मारली धडक
IND vs AUS 5th Test Australia need 162 runs win Sydney Test
IND vs AUS : बोलंडच्या दमदार गोलंदाजीसमोर पंतचे अर्धशतक पडले फिके, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मिळाले १६२ धावांचे लक्ष्य
Ryan Rickelton scores fastest double Century for South Africa in 17 years in Test Match SA vs PAK
SA vs PAK: आफ्रिकेच्या रायन रिकेल्टनने पहिल्याच कसोटी झळकावलं ऐतिहासिक द्विशतक, WTC मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

ऑस्ट्रेलियन संघाने ज्या पद्धतीने सामना गमावला, त्यामुळे संघ व्यवस्थापनेची चिंता वाढली असेल. त्यांच्या फलंदाजांना आक्रमक खेळ करता आला नाही. अनुभवी डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ यांच्याशिवाय इतर फलंदाजांना ३० हून अधिक धावा करता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलियन फलंदाज भारताच्या फिरकीसमोर संघर्ष करताना दिसले. यासह अ‍ॅडम झॅम्पासह दुसऱ्या फिरकीपटूची कमतरताही संघाला जाणवली. याशिवाय मिचेल मार्शने सामन्यादरम्यान विराट कोहलीचा झेल सोडला व त्याचा फटका संघाला बसला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांना अशी चूक करून चालणार नाही. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टोइनिस दुखापतीतून सावरला आहे आणि त्याला कॅमेरून ग्रीनच्या जागी संघात स्थान मिळू शकते. स्टोइनिस ‘आयपीएल’ संघ लखनऊ सुपरजायंट्सकडून खेळतो आणि त्याला या मैदानावर खेळण्याचा चांगला अनुभव आहे. यासह वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क यांना तो साहाय्यही करेल. ग्लेन मॅक्सवेल संघासाठी दुसऱ्या फिरकीपटूची भूमिका पार पाडेल, तर लेग-स्पिनर झ्ॉम्पावर चांगल्या कामगिरीचा दबाव असेल.

हेही वाचा >>> IND vs AFG: विराट-नवीन वादावर अफगाणिस्तान कर्णधाराचे सूचक विधान; म्हणाला, “१४० कोटी भारतीयांचे मन…”

दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेच्या तीन फलंदाजांनी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. यामध्ये क्विंटन डिकॉकही लखनऊच्या संघाकडून खेळतो आणि या मैदानावरही त्याला खेळण्याचा चांगला अनुभव आहे. रासी व्हॅन डर डसन आणि विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावणारा एडीन मार्करम यांच्याकडे मोठी खेळी करण्याची क्षमता आहे. लखनऊ येथील स्टेडियमच्या खेळपट्टीवर ‘आयपीएल’दरम्यान टीका झाली होती. या खेळपट्टीतून फिरकीपटूंना मदत मिळाल्यास दक्षिण आफ्रिका तबरेझ शम्सीला संघात स्थान देऊ शकते. त्यांच्याकडे केशव महाराजचाही पर्याय आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चांगली चुरस अपेक्षित आहे.

 ऑस्ट्रेलिया

* संघाला चांगली सुरुवात करायची झाल्यास डेव्हिड वॉर्नर व मिचेल मार्श यांना आक्रमक खेळ करावा लागेल. तसेच, संघाचा पाया भक्कम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल.

* स्टीव्ह स्मिथ, मार्नस लबूशेन, अ‍ॅलेक्स कॅरी यांच्याकडून संघाला योगदान देणे अपेक्षित आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसारख्या मजबूत संघाविरुद्ध त्यांच्या गुणवत्तेचा कस लागेल.

* जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स हे संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळतील, तर फिरकीपटू अ‍ॅडम झॅम्पाला ग्लेन मॅक्सवेलकडून चांगल्या साथीची अपेक्षा असणार आहे.

दक्षिण आफ्रिका

* पहिल्या सामन्यातील शतकी खेळी करणारे रासी व्हॅन डर डसन, क्विंटन डिकॉक व एडीन मार्करम यांच्यावर संघाची प्रामुख्याने मदार असेल. यासह कर्णधार टेम्बा बव्हुमा, डेव्हिड मिलर व हेन्रिक क्लासेन यांच्याकडून संघाला अपेक्षा असतील.

* रबाडाच्या अनुपस्थितीत लुन्गी एन्गिडी, मार्को यान्सेन व जेराल्ड कोएट्झी यांच्यावर संघाच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल, तर एंडिल फेलुकवायोवरदेखील लक्ष राहील.

* संघात तबरेझ शम्सी व केशव महाराज यांच्या रूपाने चांगले फिरकीपटू आहेत. तसेच, मार्करमही चांगली गोलंदाजी करतो. त्यामुळे फिरकी गोलंदाजीतही संघाकडे पर्याय आहेत.

* वेळ : दु. २ वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्या)

Story img Loader