Matt Henry Out of World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील न्यूझीलंड संघाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सलग तीन सामने गमावल्यानंतर संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मॅट हेन्री वर्ल्डकपमधून बाहेर पडणे हा ब्लॅक कॅप्ससाठी मोठा धक्का आहे. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीच्या हाताला झालेली दुखापत गंभीर असल्याचे समोर आले आहे. अशा स्थितीत त्याला विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. पण आता संघाने मॅट हेन्रीच्या जागी आणखी एका स्टार वेगवान गोलंदाज काइल जेमिसनचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुधवारी रात्री दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गोलंदाजी करताना मॅट हेन्रीला दुखापत झाली होती. परिस्थिती अशी होती की त्याला आपले षटक मध्येच सोडावे लागले. सामन्यानंतर त्याचे एमआरआय स्कॅन करण्यात आले, ज्यामध्ये त्याची दुखापत गंभीर असून ती बरी होण्यास दोन ते चार आठवडे लागतील असे स्पष्ट झाले. यानंतर न्यूझीलंड संघाने हेन्रीला वगळले आणि त्याच्या जागी जेमिसनचा समावेश करण्याचा निर्णय घेतला.

AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Ranji Trophy Mumbai Crush Odisha By An Innings & 103 Runs
Ranji Trophy : शम्स मुलानीच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबईने ओडिशाचा उडवला धुव्वा! एक डाव आणि १०३ धावांनी चारली धूळ
Sanju Samson breaks Dhoni record to become joint 7th Indian batter
Sanju Samson : संजू सॅमसनने धोनीला मागे टाकत केला खास पराक्रम, टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरला सातवा भारतीय
Alzarri Joseph Got Angry on West Indies Captain Shai Hope on Field Setting and Leaves the Ground in Live Match of WI vs ENG Watch Video
Video: अल्झारी जोसेफ कर्णधारावरच भडकला, रागाच्या भरात थेट गेला मैदानाबाहेर, १० खेळाडूंसह खेळण्याची वेस्ट इंडिजवर ओढवली वेळ
IND A vs AUS A India A team Ball Tempering Controversy David Warner Asks Cricket Australia Official Statement
IND vs AUSA: भारताच्या दबावामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बॉल टेम्परिंग प्रकरण गुंडाळलं; डेव्हिड वॉर्नरचं मोठं वक्तव्य

न्यूझीलंड संघ व्यवस्थापनाला मॅट हेन्रीच्या एमआरआय स्कॅनच्या निकालांबद्दल आधीच माहिती होती की त्याची दुखापत लवकर बरी होणार नाही. अशा स्थितीत आफ्रिकेसोबतच्या सामन्यानंतर लगेचच त्यानी वेगवान गोलंदाज काईल जेमिसनला भारतात येण्याचे आमंत्रण पाठवले होते. जेमिसनही गुरुवारी रात्री संघात सामील झाला आहे. तो बेंगळुरूमध्ये संघासोबत सराव सत्रात भाग घेत आहे. त्याला आधी मॅट हेन्रीसाठी कव्हर म्हणून बोलावण्यात आले होते, पण आता त्याला किवी संघाच्या विश्वचषक संघाचा भाग बनवण्यात आले आहे.

हेही वाचा – NED vs AFG, World Cup 2023: नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय, जाणून घ्या दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड

विश्वचषकात सहभागी होण्यासाठी खरोखरच उत्साहित –

न्यूझीलंड संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, “आम्ही भाग्यवान आहोत की काइलसारख्या क्षमतेचा खेळाडू आमची वाट पाहत आहे. त्याचे कौशल्य आणि शारीरिक गुणधर्म त्याला एक उत्कृष्ट गोलंदाज बनवतात आणि स्पर्धेच्या पहिल्या दोन आठवड्यात तो आमच्यासोबत सराव करू शकला हा एक अतिरिक्त बोनस आहे. काईलला पाठीच्या दोन वेगवेगळ्या दुखापतींमधून बरे होण्यासाठी खूप मेहनत करावी लागली आहे आणि मला माहित आहे की तो त्याच्या पहिल्या एकदिवसीय विश्वचषकात सहभागी होण्यासाठी खरोखरच उत्साहित आहे.”

हेही वाचा – IND vs SL, World Cup 2023: श्रेयस अय्यर झेलबाद होताच अथिया शेट्टी झाली नाराज, VIDEO होतोय व्हायरल

काइल जेमिसनला देखील भारतीय खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्याचा खूप अनुभव आहे. आयपीएलच्या मागील हंगामात जेमिसन चेन्नई सुपर किंग्जकडून गोलंदाजी करताना दिसला होता. काईलने आतापर्यंत आयपीएलमध्ये ९ सामने खेळले असून त्यात ९ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय, त्याने न्यूझीलंड संघासाठी १३ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यात १४ विकेट घेतल्या आहेत.