Matt Henry Wicket Hat Trick Video : पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने न्यूझीलंडचा ९४ धावांनी पराभव केला. न्यूझीलंडला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. परंतु, वेगवान गोलंदाज मॅट हेनरीने विकेट हॅट्रिक घेत इतिहास रचला. हेनरी न्यूझीलंडकडून टी-२० मध्ये विकेट हॅट्रिक घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. हेनरीने सामन्यात पाकिस्तानच्या इनिंगमध्ये १३ व्या षटकात चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर शादाब खान आणि इफ्तिखार अहमदला सलग दोन चेंडूवर बाद केलं. त्यानंतर हेनरीला १८ व्या षटकात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शाहिन आफ्रिदीला बाद करून हेनरीने विकेट हॅट्रिक घेण्याची कमाल केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेनरीच्या आधी जॅकब ओरम, टीम साऊदी आणि मायकल ब्रेसवेलने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडसाठी विकेट हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केला. साऊदीने त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनवेळा विकेट हॅट्रिक घेण्याची कमाल केली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करून १८२ धावा केल्या होत्या. फखर जमाने ४७ आणि सईम अयूबने ४७ धावांची खेळी केली. सामन्यात बाबरने फक्त ९ धावा केल्या. कीवी टीमकडून हेनरीने ३ विकेट, मिल्ने आणि बेन लिस्टरला प्रत्येकी २ विकेट मिळाल्या.

नक्की वाचा – IPL 2023 KKR vs SRH: दोन ओव्हर्समध्ये ३६ धावा देऊनही उमरान मलिक समाधानी, कारण…

त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून न्यूझीलंडच्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. न्यूझीलंड टीम १५.३ षटकात फक्त ९४ धावाच करू शकली. पाकिस्तानकडून हारिस रौफने चमकदार कामगिरी करत ३.३ षटकात १७ धावा देत ४ विकेट घेतल्या. हारिस रौफला प्लेयर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आले. हारिसचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matt henry takes wicket hat trick against pakistan becomes new zealand player to make this record in t20 cricket nss
Show comments