बंगळुरूत एम.चिन्नास्वामी स्टेडियमवर भारताची अवस्था 40/8 अशी झालेली. जसप्रीत बुमराह न्यूझीलंडचं आक्रमण थोपवण्याचा प्रयत्न करत होता. विल्यम ओ रुकच्या उसळत्या चेंडूवर बुमराहने पुलचा फटका खेळला. चेंडूवरची नजर काढून घेत मारलेला हा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हवेत उडाला. नुकतंच षटक संपवून फाईन लेगला क्षेत्ररक्षण करायला पोहोचलेल्या हेन्रीने धावायला सुरुवात केली. प्रचंड अंतर कापून तो चेंडूपर्यंत पोहोचला. डाईव्ह लगावत त्याने बुमराहची खेळी संपुष्टात आली. कारकीर्दीत सातत्याने दुखापतींने घेरलेल्या हेन्रीने गोलंदाजीच्या बरोबरीने क्षेत्ररक्षणातही चमक दाखवत भारतीय संघाला अडचणीत आणलं आणि पुन्हा एकदा मॉट हेन्री आणि भारतीय संघ या कटू आठवणींना उजाळा मिळाला.

२०१९ वर्ल्डकप स्पर्धेत भारताने दिमाखदार खेळ करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता. तिथे त्यांच्यासमोर तुल्यबळ न्यूझीलंडचं आव्हान उभं ठाकलं. पावसामुळे दोन दिवस चाललेल्या या मुकाबल्यात न्यूझीलंडने २३९ धावांची मजल मारली. कर्णधार केन विल्यमसनने ६७ धावांची खेळी केली. अनुभवी रॉस टेलरने ७४ धावांची खेळी साकारत न्यूझीलंडला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. भारतातर्फे भुवनेश्वर कुमारने ३ विकेट्स पटकावल्या.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
AUS vs PAK Pakistan beat Australia by 8 wickets in the third ODI match
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात फडकावला झेंडा, वर्ल्ड चॅम्पियन संघाला घरच्या मैदानावर पाजलं पाणी
harris rauf celebrating wicket of glen maxwell
Pak vs Aus: भारताविरूद्धची तयारी पडली कांगारुंना भारी; पाकिस्तानने उडवला १४० धावात खुर्दा
nathan mcswinney
Ind vs Aus: भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाने दिली ‘या’ नव्या खेळाडूला संधी; पर्थ कसोटीसाठी केला संघ जाहीर
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत

या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना मॉट हेन्रीच्या झंझावातासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. ऑफस्टंपला रोखून मारा करणाऱ्या हेन्रीने झंझावाती फॉर्मात असणाऱ्या रोहित शर्माला माघारी धाडलं. काही क्षणात हेन्रीच्या फसव्या चेंडूवर राहुलच्या बॅटची कड घेऊन चेंडू विकेटकीपर टॉम लॅथमच्या ग्लोव्ह्जमध्ये जाऊन विसावला. पुढच्या षटकात हेन्रीचा फटका दिनेश कार्तिकने बॅटपासून दूर खेळला. गलीमध्ये जेमी नीशामने जमिनीलगत सूर लगावत अफलातून झेल टिपला. हेन्रीच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाज निरुत्तर ठरले होते. हेन्रीला सहकारी ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन यांची सुरेख साथ मिळाली. भारतीय संघाचा डाव २२१ धावांत संपुष्टात आला आणि वर्ल्डकप विजयाचं स्वप्न भंगलं. हेन्रीने १० षटकात एक षटक निर्धाव टाकताना ३७ धावांच्या मोबदल्यात ३ मोहरे टिपले. हेन्रीलाच सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.

बंगळुरू कसोटीत पावसामुळे ढगाळ वातावरणाचा पुरेपूर फायदा उठवत हेन्रीने भारताच्या डावाला खिंडार पाडलं. पहिल्या षटकापासून ऑफस्टंपवर मारा करत सलामीवीर रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांना सतावलं. शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्यामुळे संधी मिळालेल्या सर्फराझ खानला हेन्रीने चकवलं. हेन्रीला प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे सरसावलेल्या सर्फराझचा फटका हवेत उडाला. डेव्हॉन कॉनवेने अतिशय चपळतेने झेल टिपत सर्फराझला तंबूत धाडलं. गेल्या काही वर्षात सहाव्या-सातव्या क्रमांकावर येत डाव सावरण्याचं काम रवींद्र जडेजाने सातत्याने केलं आहे. या सामन्यात हेन्रीने त्याला मोठी खेळी करू दिली नाही. गुड लेंथ आणि लेगस्टंपचा चेंडू तटवण्याचा जडेजाचा प्रयत्न होता. पण चेंडू हवेत उडाला आणि एझाझ पटेलने झेल टिपला.

लंचनंतरच्या पहिल्याच चेंडूवर हेन्रीने अनुभवी रवीचंद्रन अश्विनला माघारी परतावलं. खेळण्यास भाग पाडणाऱ्या या चेंडूवर अश्विनने बचावाचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपच्या दिशेने ग्लेन फिलीप्सच्या हातात गेला. वॉबल सिमद्वारे हेन्रीने धोकादायक ठरू शकणाऱ्या ऋषभ पंतला बाद केलं. अवघ्या काही षटकात सामन्याचं पारडं फिरवण्याची ताकद ऋषभकडे आहे. हेन्रीच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर ऋषभ निष्प्रभ ठरला. कुलदीप यादवला तंबूत धाडत हेन्रीने डावात पाच विकेट्स पटकावण्याची किमया केली. हेन्रीने १३.२ षटकात अवघ्या १५ धावांच्या मोबदल्यात ५ विकेट्स टिपल्या.

कसोटी कारकीर्दीत चौथ्यांदा हेन्रीने डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली. २०१५ मध्ये हेन्रीने इंग्लंडविरुद्ध पदार्पण केलं होतं. दशकभराच्या काळात हेन्री न्यूझीलंडसाठी फक्त २५ कसोटी सामने खेळला आहे. ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी आणि नील वॅगनर हे त्रिकुट दमदार कामगिरी करत असल्यामुळे हेन्रीला अंतिम अकरात फारशी संधीच मिळाली नाही. या तिघांपैकी कोणाला दुखापत झाल्यास हेन्रीचा संघात समावेश होत असे. याबरोबरीने दुखापतींनी हेन्रीला सातत्याने त्रास दिला आहे. यामुळे संघात निवड होऊनही हेन्रीला अनेक सामन्यात खेळता आलेलं नाही. हेन्रीने पदार्पण केल्यापासून न्यूझीलंडने ७५ सामने खेळले आहेत. यापैकी केवळ २५ मध्ये हेन्री अंतिम अकराचा भाग होता.

२०१६ मध्ये न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर असताना कोलकाता इथे झालेल्या कसोटीत हेन्रीने ६ विकेट्स घेतल्या होत्या. मात्र त्यानंतर झालेल्या इंदूर कसोटीत हेन्रीने शंभरहून अधिक धावा दिल्या होत्या. भारताविरुद्ध ३ कसोटीत हेन्रीने ११ विकेट्स पटकावल्या आहेत. वनडेतही भारताविरुद्ध खेळताना १० सामन्यात हेन्रीने १६ विकेट्स घेतल्या आहेत.