Shadab Khan compared to Ravindra Jadeja: भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने गेल्या काही वर्षांत बॅट आणि बॉलने अप्रतिम कामगिरी केली आहे. सध्या त्याच्यासारखे अष्टपैलू मोजकेच आहेत, ज्यांच्यात सामन्याचा निकाल बदलवण्याची ताकद असणारे खेळाडू फार कमी आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने शादाब खानची तुलना अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाशी केली आहे. त्याच्या या वक्तव्याने भारतीय क्रिकेट चाहते मात्र, नाराज झाले आहेत. पाकिस्तानचा शादाब खान जडेजाइतकाच ‘3D प्लेयर’ आहे, असे हेडनचे मत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर आणि पाकिस्तानचे माजी फलंदाजी प्रशिक्षक मॅथ्यू हेडनने शादाब खानची तुलना रवींद्र जडेजाशी केली आणि पाकिस्तानी स्टारला ‘3D क्रिकेटर’ म्हणून संबोधले. हेडन पुढे म्हणाला की, “आगामी विश्वचषक २०२३ मध्ये शादाब आणि जडेजा हे पाकिस्तान आणि भारतासाठी सर्वात महत्त्वाचे क्रिकेटपटू असतील.”

मॅथ्यू हेडनने शादाब खानची तुलना रवींद्र जडेजासोबत केली आहे

शादाब खानचा अलीकडचा फॉर्म मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खूपच प्रभावी ठरला आहे. लेग-स्पिन गोलंदाज म्हणून पाकिस्तान क्रिकेट संघाचा आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज असण्यासोबतच तो एक स्फोटक फलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे. दरम्यान, मॅथ्यू हेडनने शादाबवर कौतुकाचा वर्षाव केला आणि त्याचे वर्णन एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून केले. ऑस्ट्रेलियन दिग्गज पुढे म्हणाला की, “शादाब फलंदाजीत धोकादायक आहेच पण गोलंदाजीत देखील खूप विविधता आहे.”

हेही वाचा: IND vs WI: कसोटी मालिकेसाठी भारताचा कसून सराव, बार्बाडोसमध्ये टीम इंडियाने केली मजा, व्हॉलीबॉल खेळतानाचा Video व्हायरल

मॅथ्यू हेडनचे मत आहे की, “पाकिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू शादाब खानची भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाशी तुलना करणे योग्य आहे. कारण, तो CSKच्या आयपीएल २०२३ विजेत्या स्टारप्रमाणे खेळाच्या तिन्ही पैलूंमध्ये (फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण) तितकाच यशस्वी आहे.”

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना मॅथ्यू हेडन म्हणाला की, “शादाब खान एक उत्कृष्ट खेळाडू आहे. क्रिकेटपटूमध्ये असायला हवेत असे सर्व गुण त्याच्याकडे आहेत. ‘जड्डू’ (रवींद्र जडेजा) प्रमाणेच शादाब खान हा ‘3D क्रिकेटर’ आहे. तो मोठे फटके मारण्यात विरोधी संघासाठी खूप धोकादायक आहे, गोलंदाजीतमध्ये अनेक तो वेगळे पर्याय वापरून फलंदाजाला बाद करतो. तो एक अप्रतिम क्षेत्ररक्षकही आहे. मी एक गोष्ट सांगू इच्छितो, तुम्ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाच्या जोरावर विश्वचषक जिंकलात.”

हेही वाचा: T20 Team: मिशन टी२० वर्ल्डकप! BCCI नवे मुख्य निवडकर्ता सहा दिग्गज खेळाडूंच्या भविष्यावर घेणार निर्णय, रोहित-विराटचे काय होणार?

 शादाब खान आणि रवींद्र जडेजा आगामी आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३मध्ये १५ ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात खेळताना दिसतील. सध्या, रवींद्र जडेजा वेस्ट इंडिजविरुद्ध भारताकडून खेळताना दिसणार आहे, दुसरीकडे शादाब इंग्लंडमध्ये टी२० ब्लास्ट २०२३ मध्ये खेळत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Matthew hayden considers shadab khan as a cricketer of ravindra jadejas standard avw
Show comments