Champions Trophy Australia Injury Setback: चॅम्पियन्स ट्रॉफीतील ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान हा सामना पावसामुळे रद्द झाला आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियन संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. लाहोरमध्ये अफगाणिस्तानने चांगली धावसंख्या उभारली होती, पण पावसामुळे अफगाणिस्तानला सामन्यात शेवटपर्यंत झुंज देण्याची संधी मिळाली नाही. पण यादरम्यान ऑस्ट्रेलियाला मोठा धक्काही बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑस्ट्रेलियन संघाचा उत्कृष्ट सलामीवीर मॅथ्यू शॉर्टच्या मांडीला दुखापत झाली आहे. यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीसाठी ऑस्ट्रेलियाला आपल्या टॉप ऑर्डरमध्ये बदल करावे लागणार आहेत. अफगाणिस्तानच्या डावात फलंदाजी करताना शॉर्टला दुखापत झाली. पण तरीही त्याने ट्रॅव्हिस हेडसह फलंदाजीची सुरुवात केली, पण धावा काढण्यासाठी तो संघर्ष करताना दिसला.

अफगाणिस्तानविरुद्ध, शॉर्टने १५ चेंडूत २० धावा केल्या आणि ४.३ षटकांत ४४ धावांची सलामी भागीदारी केली. मिडऑनला तो झेलबाद झाला. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथने कबूल केले की शॉर्टला फिट होण्यासाठी वेळ मिळाला नव्हता. सामन्यानंतर स्मिथ म्हणाला, “मला वाटतंय की त्याला त्रास होत असणार. म्हणजे, आपण आज रात्री पाहिलं की त्याला हालचाल करण्यासही त्रास होत आहे. मला वाटतं की पुढील सामन्यामधील वेळेदरम्यान तो फिट होऊ शकतो.”

दुखापतग्रस्त मिचेल मार्शची जागा घेणारा जेक फ्रेझर-मॅकगर्क हा संघातील अतिरिक्त फलंदाज आहे आणि तो टॉप ऑर्डरमध्ये शॉर्टची जागा घेऊ शकतो. ऑस्ट्रेलियाकडे इतर पर्याय आहेत जसे की अष्टपैलू ॲरॉन हार्डीला संधी दिली जाऊ शकते. स्मिथ म्हणाला, “आमच्याकडे काही खेळाडू आहेत जे खेळू शकतात.

डावखुरा फलंदाज आणि डावखुरा फिरकीपटू कूपर कॉनोली हा ट्रॅव्हलिंग रिझर्व म्हणून आहे आणि जर शॉर्टला स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांमधून अधिकृतपणे वगळले गेले तर त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो. शॉर्टच्या अनुपस्थितीत, फिरकी गोलंदाजीसाठी कमी पर्याय असतील. शॉर्टने अफगाणिस्तानविरुद्ध शानदार कामगिरी केली होती आणि सात षटकांत फक्त २१ धावा दिल्या होत्या. मात्र, ऑस्ट्रेलियाकडे फिरकी गोलंदाजी करू शकणारे इतर अनेक फलंदाज आहेत. इंग्लंडविरुद्ध हेड आणि मार्नस लॅबुशेन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतले होते.