Australian Cricketer Announced Retirement: ऑस्ट्रेलियन संघाने फक्त एकदाच टी२० विश्वचषक जिंकला आहे. २०२१ मध्ये पाकिस्तानला पराभूत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरले होते. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज मॅथ्यू वेडने ऑस्ट्रेलियन संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याच मॅथ्यू वेडने अचानक निवृत्तीची घोषणा करत चाहत्यांना धक्का दिला आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आणि संघासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले.

मॅथ्यू वेडने २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून त्याने संघासाठी ९२ टी-२० सामन्यांमध्ये १२०२ धावा केल्या आहेत, ज्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. २०२१ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्धची वेडची खेळी कायम स्मरणार राहणारी अशी आहे. मॅथ्यू वेडने ऑस्ट्रेलियाला हरलेला सामना जिंकून दिला. वेडने सामन्याच्या १९ व्या षटकात शाहीन आफ्रिदीला लागोपाठ तीन षटकार ठोकले आणि सामना ऑस्ट्रेलियाच्या दिशेने वळवला. त्यानंतर त्याने अवघ्या १७ चेंडूंत २ चौकार आणि ४ षटकारांसह ४१ धावा केल्या.

IND vs NZ Kane Williamson ruled out of third Test in Mumbai After New Zealand Clinch 1st Test Series in India
IND vs NZ: भारताविरूद्ध मालिका विजयानंतर न्यूझीलंड संघाला बसला धक्का, मुंबई कसोटीतून ‘हा’ दिग्गज खेळाडू बाहेर
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
IND vs NZ Harshit Rana called up to India Test squad, likely to make debut in Mumbai against New Zealand Mumbai Test
IND vs NZ: मुंबई कसोटीपूर्वी टीम इंडियात मोठा बदल, या वेगवान गोलंदाजाची भारतीय संघात होणार एन्ट्री, पदार्पणाची मिळणार संधी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर एबी डिव्हिलियर्सने उपस्थित केले प्रश्न; म्हणाला, ‘सत्य हे आहे की…’
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
IND vs NZ AB de Villiers statement on Virat Kohli and Team India
IND vs NZ : ‘आता तो काळ गेला…’, लाजिरवाण्या पराभवानंतर विराटसह टीम इंडियाबद्दल एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य
IND vs NZ Anil Kumble Lashes Out At Rohit Sharma and Gautam Gambhir
IND vs NZ : ‘तुम्ही फलंदाजांना दोष देऊ नका…’, मालिका गमावल्यानंतर अनिल कुंबळे रोहित-गौतमवर संतापले
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा – IND vs NZ: “सचिन तेंडुलकर ४० व्या वर्षी…”, न्यूझीलंडविरूद्ध अपयशी ठरलेल्या रोहित-विराटला सचिनचं उदाहरण देत चाहत्यांचा तिखट सवाल

प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार मॅथ्यू वेड

मॅथ्यू वेडने निवृत्तीची घोषणा केली असेल, परंतु तो टास्मानिया आणि होबार्ट हरिकेन्स तसेच काही परदेशी लीगसाठी व्हाईट-बॉल क्रिकेट खेळत राहील. याशिवाय निवृत्तीनंतर त्यांनी कोचिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याला यष्टिरक्षण आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा – IND vs NZ: भारताने कसोटी मालिका गमावल्यानंतर BCCIने काढलं फर्मान, प्रत्येक खेळाडूने मुंबईतील सामन्यापूर्वी…

मॅथ्यू वेड निवृत्तीची घोषणा करताना म्हणाला की, मी गेल्या काही वर्षांपासून चांगली कामगिरी करत होतो आणि त्यानंतर मला सातव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली आणि फिनिशर म्हणून मी त्याच भूमिकेत राहावे अशी त्यांची इच्छा होती. टी-२० विश्वचषकानंतर मला समजले की माझ्या क्रिकेट कारकीर्दीला पूर्णविराम देण्याची आता वेळ आली आहे.

हेही वाचा – Gary Kirsten Resigned: पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप, अवघ्या ६ महिन्यातच गॅरी कर्स्टन यांनी प्रशिक्षकपदाचा दिली राजीनामा, काय आहे कारण?

वेडने आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. त्याने ऑस्ट्रेलियासाठी ३६ कसोटी सामन्यांमध्ये १६१३ धावा केल्या, ज्यात त्याच्या नावावर ४ शतकं आहेत. याशिवाय वेडने ९२ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण १८६७ धावा केल्या आहेत. २०२१ मध्ये त्याने शेवटचे कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळले.