क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडून टाकून होत नाही तोपर्यंत निकाल सांगता येत नाही असं म्हणतात. गुरुवारी दुबईच्या मैदानामध्ये झालेल्या टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यामध्ये याचा प्रत्यय आला. एकावेळी पाकिस्तान सहज अंतिम सामन्यात पोहचणार असं वाटत असतानाच अचानक सामना फिरला आणि ऑस्ट्रेलियाने २४ चेंडूंमध्ये ५० धावा हव्या असताना ६ चेंडू शिल्लक राखत सामना पाच गडी राखून जिंकला. अर्थात या भन्नाट विजयाचे शिल्पकार ठरले ऑस्ट्रेलियाचे फलंदाज तर पाकिस्तानने सामना गमवला शाहीन आफ्रिदीने टाकलेल्या १९ व्या षटकात.
नक्की वाचा >> दोन टप्पा चेंडूवर षटकार लगावल्याने गौतम गंभीर संतापला; म्हणाला, “हे लज्जास्पद असून वॉर्नरने…”
शाहीनच्या या षटकाचे पहिले तीन चेंडू झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला ९ चेंडूत विजयासाठी १८ धावा हव्या होत्या. मॅथ्यू वेडने शाहीन आफ्रिदीच्या षटकामधील पुढच्या तीन चेंडूंवर सलग तीन षटकार लगावत ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीत जागा मिळवून दिली. १७ चेंडूंत नाबाद ४१ धावा करणारा वेड सामानावीर तर ठरलाच मात्र वेडने लगावलेल्या पहिल्या षटकारामुळे अनेकांना २००७ सालच्या पहिल्या टी-२० स्पर्धेतील एक शॉर्ट आठवला. याच दोन्ही शॉर्टची तुलना सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.
झालं असं की शाहीन आफ्रिदीने १९ व्या षटकामध्ये टाकलेल्या चौथ्या चेंडूवर वेडने स्कूप शॉर्ट लगावला आणि तो थेट मागील बाजूस षटकार गेला. त्यानंतर शाहीनची लय बिघडली आणि पुढील दोन चेंडूंवरही त्याने षटकार खाल्ले. वेडने लगावलेल्या या स्कूप शॉर्टमुळे अनेकांना २००७ साली झालेल्या पहिल्या टी-२० विश्वचषक सामन्यामध्ये मिस्बाह उल हकने लगावलेल्या फटक्याची आठवण झालीय.
नक्की वाचा >> सकाळी ICU मधून डिस्चार्ज मिळाला अन् संध्याकाळी तो देशासाठी सर्वाधिक धावा करणारा ठरला
२००७ साली टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पाकिस्तानला चार चेंडूत विजयासाठी ६ धावांची गरज होती. त्यावेळी जोगिंदर शर्मा गोलंदाजी करत होता. पाकिस्तानचा तत्कालीन कर्णधार मिस्बाह उल हकने षटकातील तिसऱ्या चेंडूवर फाईन लेगच्या दिशेने स्कूप फटका मारला. चेंडू आकाशात उंच गेला आणि क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या श्रीशांतने तो झेल टिपल्याने पहिल्यावहिल्या टी-२० विश्वचषकावर भारताचे नाव कोरले गेले. त्या फटक्यामुळे पाकिस्तानला सामना आणि विश्वचषक दोन्ही गमावावं लागलं होतं.
नक्की वाचा >> T20 World Cup: …अन् ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान सामन्यादरम्यान सानिया मिर्झावरुन भारतीयांमध्येच जुंपली
दुबईत झालेल्या गुरुवारच्या सामन्यामध्येही वेडने लगावलेल्या स्कूप शॉर्टमुळे सामन्याचं चित्र पालटलं. या षटकाच्या आधीची आपली तीन षटकं भन्नाट गोलंदाजी करणारा शाहीन आफ्रिदी पाकिस्तानला विकेट मिळवून देईल असं वाटत असतानाच वेडने अगदी बिनधास्तपणे हा चेंडू नियोजनपूर्वक पद्धतीने डोक्याचे मागून थेट सीमेपल्याड धाडला आणि शाहीन आफ्रिदीलाही हा शॉर्ट पाहून धक्का बसला. यानंतर संपूर्ण स्पर्धेत उत्तम गोलंदाजी करणाऱ्या शाहीनला लय गवसलीच नाही आणि पुढच्या दोन चेंडूंवरही सलग दोन षटकार लगावत ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला. या फटक्यामुळे अनेकांनी मिस्बाहचा तो फटका आठवलाय. अनेकजण आता पाकिस्तान आणि स्कूप शॉर्टचा ३६ चा आकडा असल्याचं सांगत मिम्स शेअर करत आहेत.
नक्की पाहा >> Video: पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने केली विराट, रोहित आणि राहुलची नक्कल; व्हायरल झाला व्हिडीओ
वर्ष बदलली पण तो शॉर्ट नाही
६६६ ला सुरुवात झालेला शॉर्ट आणि तो शॉर्ट
पहिल्यांदा स्कूप शॉर्टने पाकिस्तानचा घात केला तो २००७ मध्ये
पाकिस्तान क्रिकेट आणि स्कूप शॉर्ट
जुन्या आठवणी
भयानक स्वप्न
ही तर प्रेमकथा
कसा शॉर्ट मारायचा हे शिकवतोय
पुन्हा एकदा
२००७ च्या विश्वचषक गामावणाऱ्या या फटक्याबद्दल बोलताना मिस्हाबने हा फटका मारल्याचं वाईट वाटतं नसल्याचं एका मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलेलं. त्या स्कूप शॉटबद्दल मला अजिबात पश्चात्ताप होत नाही. त्यावेळी विश्वचषक जिंकण्याची संधी आम्ही गमावली. त्याचे काही दिवस वाई़ट वाटले, हे खरे. पण आयुष्यात पुढे जात राहणे, ही गरज आहे. मी ही तेच केले, असं मिस्हाब या फटक्याबद्दल बोलताना म्हणाला होता.