इंग्लंडविरुद्ध 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेत विंडीजच्या संघाने धावांचा डोंगर उभा करुनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 361 धावांचं आव्हान इंग्लंडने जेसन रॉय आणि जो रुटच्या शतकी खेळाच्या जोरावर पूर्ण केलं. विंडीजकडून वन-डे संघात पुनरागमन करणाऱ्या ख्रिस गेलने वादळी खेळी करत 135 धावा केल्या. संपूर्ण सामन्यात विंडीजच्या फलंदाजांनी मैदानावर षटकारांचा पाऊस पाडला. विंडीजच्या डावात तब्बल 23 षटकार लगावले गेले. यातले 12 षटकार हे ख्रिस गेलने लगावले आहेत. एकाच डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा न्यूझीलंडच्या संघाच्या नावावर असलेला विक्रम विंडीजने आपल्या नावे जमा केला आहे.

अवश्य वाचा – गेलने मोडला आफ्रिदीचा विक्रम, झाला षटकारांचा बादशाह

विंडीजच्या नर्सने आदिल रशिदच्या गोलंदाजीवर लाँग ऑनवरुन षटकार खेचत विंडीजला विक्रम साधून दिला. याच सामन्यात ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीलाही मागे टाकलं. मात्र गचाळ क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांनी केलेल्या स्वैर माऱ्यामुळे इंग्लंडने सामन्यात बाजी मारली.

Story img Loader