पदार्पणाच्या हंगामातच गुजरात टायटन्स संघाला आयपीएल स्पर्धेचं जेतेपद मिळवून देणारा कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सकडे परतण्याची चिन्हं आहेत. आयपीएलच्या २०२४ हंगामासाठी १९ डिसेंबरला दुबईत लिलाव होणार आहे. पण त्याआधी २६ नोव्हेंबरला ट्रान्सफर विंडोचा अवधी संपत आहे. ट्रान्सफर विंडोअंतर्गत संघांना परस्पर सामंजस्याने खेळाडूंची अदलाबदल करता येते. हार्दिकच्या घरवापसीबाबत गुजरात टायटन्स किंवा मुंबई इंडियन्स संघव्यवस्थापनाने यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

२०१५ मध्ये हार्दिकने मुंबई इंडियन्ससाठीच खेळताना आयपीएल पदार्पण केलं होतं. क्रिकइन्फो वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्स तब्बल १५ कोटी रुपये खर्चून हार्दिकला ताफ्यात घेणार असल्याचं वृत्त आहे. सगळं जुळून आलं तर आयपीएल स्पर्धेतला हा सगळ्यात मोठा ट्रेडऑफ ठरेल.

Sanju Samson broke Yusuf Pathan's 15-year-old record
IND vs SA : संजू सॅमसनने सलग दोन शतकांनंतर केला नकोसा विक्रम, ‘या’ बाबतीत युसूफ-रोहितला टाकले मागे
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
AUS vs PAK Pakistan won the ODI series in Australia after 22 years
AUS vs PAK : पाकिस्तानने २२ वर्षांनी नोंदवला ऐतिहासिक विजय, भारताला मागे टाकत ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला आशियाई संघ
Maharashtra coach Sulakshan Kulkarni regretted the loss of victory sports news
निराशाजनक पराभवामुळे आव्हान खडतर! विजय निसटल्याची महाराष्ट्राचे प्रशिक्षक सुलक्षण कुलकर्णी यांना खंत
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ
Most rebellion in Konkan in bjp
कोकणात सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…

२०२२ मध्ये मोठ्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि कायरेन पोलार्ड यांना रिटेन केलं होतं. हार्दिकला रिटेन न करता पोलार्डला संघात कायम ठेवल्याने मुंबई इंडियन्सच्या धोरणांवर टीकाही झाली होती. मुंबईने हार्दिकच्या रुपात गमावलेली संधी आयपीएलमधील नवा संघ गुजरात टायटन्सने हेरली. हार्दिक पंड्याचं नेतृत्व आणि आशिष नेहरा यांचं मार्गदर्शन या जोडगोळीने पहिल्याच हंगामात संघाला जेतेपद मिळवून दिलं. हार्दिकच्या नेतृत्वाचं कौतुक झालं होतं. या यशातूनच हार्दिकला भारताच्या ट्वेन्टी२० संघाची कमान मिळाली होती. आयपीएलच्या अंतिम लढतीत हार्दिकच सामनावीर होता. २०२३ मध्येही गुजरात टायटन्स संघाने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र चेन्नईने त्यांना नमवलं. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरातने प्राथमिक फेरीअखेर गुणतालिकेत अव्वल स्थान राखत प्लेऑफ्समध्ये प्रवेश केला होता.

गुजरातसाठी दोन हंगाम खेळताना हार्दिकने ३० डावात ४१.६५च्या सरासरीने ८३३ धावा केल्या आहेत. त्याने ११ विकेट्सही पटकावल्या आहेत. नुकत्याच झालेल्या वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशविरुद्धच्या लढतीदरम्यान हार्दिक दुखापतग्रस्त झाला होता.

हार्दिकला संघात समाविष्ट करण्यासाठी मुंबईला काही खेळाडूंना रिलीज करुन तिजोरीत पुंजी जमवावी लागेल. लिलावावेळी प्रत्येक संघाला ५ कोटी रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. मुंबई इंडियन्सने सर्वकाही जुळून आणलं तर ट्रेडऑफ होणारा हार्दिक हा आयपीएलमधला तिसरा कर्णधार असेल. याआधी रवीचंद्रन अश्विन किंग्ज इलेव्हन पंजाबकडून दिल्लीकडे तर अजिंक्य रहाणे राजस्थानकडून दिल्लीकडे आला होता.

गुजरात टायटन्स संघाची निर्मिती झाली त्यावेळी त्यांनी प्रत्येकी १५ कोटी रुपये खर्चून हार्दिक आणि रशीद खान यांना ताफ्यात समाविष्ट केलं. मुंबई इंडियन्सने हार्दिकचं नैपुण्य हेरत त्याला संघात घेतलं. याच संघाच्या माध्यमातून अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने ओळख प्रस्थापित केली. २०१५ मध्ये अवघ्या १० लाख रुपयात मुंबईने हार्दिकला घेतलं होतं. मुंबईच्या २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० आयपीएलविजेत्या संघाचा हार्दिक अविभाज्य घटक होता.

२०२२ हंगामापूर्वी मुंबईने हार्दिकला सोडलं त्याचवेळी सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. कारण आधीच्या सर्व लिलावांवेळी हार्दिकला मुंबईने रिटेन केलं होतं. रोहित शर्मा भारतासाठी ट्वेन्टी२० खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हार्दिककडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान अन्य ट्रेडऑफ्समध्ये लखनौ सुपरजायंट्सने रोमारिओ शेफर्डला रिलीज केलं आहे. अष्टपैलू शेफर्ड आता मुंबई इंडियन्ससाठी खेळताना दिसेल.

देवदत्त पड्डीकल आता राजस्थान रॉयल्सऐवजी लखनौ सुपरजायंट्स संघासाठी खेळताना दिसेल. या बदल्यात राजस्थानने वेगवान गोलंदाज अवेश खानला संघात समाविष्ट केलं आहे.

जिगरबाज अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने आयपीएल २०२४साठी उपलब्ध नसल्याचं कळवलं आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला संघात बदल करावे लागतील.