Yuzvendra Chahal insta story viral : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून सर्व काही ठीक नसून दोघं विभक्त होणार असल्याची चर्चा आहे. हे दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याचे बोलले जात आहे. ही बातमी समोर आल्यानंतर चहल आणि धनश्री गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. नुकतेच धनश्रीने या बातम्यांवर मौन सोडले आणि सोशल मीडियावर ट्रोलवर निशाणा साधला. यानंतर आता चहलने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे.

मागील काही कालावधीपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या चहलने नुकतेच धनश्रीसोबतचे त्याचे फोटो इंस्टा अकाऊंटवरुन काढून टाकले होते. तेव्हापासून दोघांमध्ये सर्व काही ठीक नसल्याची अटकळ सुरू झाली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामुळे चहल आणि धनश्री यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांना बळ मिळाले आहे. या रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की चहल आणि धनश्री एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेऊ शकतात.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Bipasha Basu
Video: बिपाशा बासूने शेअर केला लाडक्या लेकीचा व्हिडीओ; ‘देवी’ने जिंकली चाहत्यांची मने, पाहा व्हिडीओ
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष

युजवेंद्र चहलची इन्स्टा स्टोरी –

/

चहलने चाहत्यांचे मानले आभार –

भारताच्या नंबर वन लेग स्पिनरने इंस्टा स्टोरीमध्ये लिहिले, ‘माझ्या सर्व चाहत्यांच्या अतूट प्रेम आणि पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे, ज्यांच्याशिवाय मी इथपर्यंत पोहोचलो नसतो, पण हा प्रवास अजून संपलेला नाही! कारण माझ्या देशासाठी अजूनही अनेक अविश्वसनीय षटके टाकणे बाकी आहेत. मला एक खेळाडू असल्याचा अभिमान आहे, मी एक मुलगा, एक भाऊ आणि एक मित्र देखील आहे, मला अलीकडच्या घडामोडी, विशेषत: माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची उत्सुकता समजते. मी अशा प्रकरणांवर अनुमान लावणाऱ्या काही सोशल मीडिया पोस्ट्स पाहिल्या आहेत, ज्या खऱ्या पण असू शकतात किंवा नसू शकतात.’

हेही वाचा – Yuzvendra Chahal : युजवेंद्र चहल घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ‘मिस्ट्री गर्ल’सह कॅमेरात कैद, चेहरा लपवतानाचा फोटो व्हायरल

युजवेंद्र चहलने पुढे लिहले, ‘एक मुलगा, एक भाऊ आणि एक मित्र या नात्याने मी सर्वांना नम्रपणे विनंती करतो की, या अटकळांमध्ये गुंतू नका. कारण त्याने मला आणि माझ्या कुटुंबाला खूप त्रास झाला आहे. माझ्या कौटुंबिक मूल्यांनी मला नेहमीच प्रत्येकासाठी चांगले विचार करण्याचे शिकवले आहे. इतकंच नाही तर मी नेहमीच शॉर्टकट न वापरता समर्पण आणि मेहनत घेऊन यश मिळवायला शिकलो आहे. सहानुभूती नव्हे तर तुमचे प्रेम आणि पाठिंबा मिळवण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन. तुम्हा सर्वांचे आभार.’

Story img Loader