सलामीवीर मयांक अग्रवालने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारत अ संघाने तिरंगी मालिकेत वेस्ट इंडिजच्या संघावर मात केली आहे. ५० षटकात २२२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असलेल्या भारतीय संघाने मयांक अग्रवालच्या शतकी खेळीच्या जोरावर १०२ चेंडूंमध्ये ११२ धावांची आक्रमक खेळी केली. त्याआधी गोलंदाजीत भारताच्या दिपक चहरने १० षटकात २७ धावा देत ५ फलंदाजांना माघारी धाडलं. चहरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोऱ्यावर भारताने वेस्ट इंडिजला कमी धावसंख्येत रोखलं.

२७ वर्षीय मयांकने आपल्या शतकी खेळीत ११ चौकार आणि २ षटकार लगावले. दुसऱ्या विकेटसाठी शुभमन गिलसोबत मयांक अग्रवालने १४८ धावांची भागीदारीही रचली. शुभमन गिलनेही ५८ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. मयांक्र अग्रवाल माघारी परतल्यानंतर श्रेयस अय्यरही अवघ्या एका धावेवर माघारी परतला. मात्र यानंतर ऋषभ पंत आणि शुभमन गिल यांनी संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. ३८.१ षटकांतच भारताने वेस्ट इंडिजने दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

Story img Loader