Mayank Agarwal has been appointed as the South Division captain: २४ जुलैपासून सुरू होणाऱ्या देवधर करंडक स्पर्धेसाठी दक्षिण विभागाने आपला संघ जाहीर केला आहे. चार वर्षांनंतर सुरू होत असलेल्या देवधर करंडकात दक्षिण विभागाने संघाची कमान मयंक अग्रवालकडे सोपवली आहे. या संघात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचाही समावेश करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अर्जुन तेंडुलकरने आयपीएल २०२३ मध्ये मुंबई संघाकडून पदार्पण केले. त्याला संपूर्ण सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे तो स्वत:ला आणखी सुधारण्यासाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सतत खेळत आहे. अर्जुन तेंडुलकर दक्षिण विभागासाठी त्याची पहिली विभागीय स्पर्धा खेळणार आहे.

या खेळाडूंनाही मिळाले स्थान –

अरुण कार्तिक आणि साई किशोर या खेळाडूंचा दक्षिण विभागाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. या दोघांनी अलीकडेच तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये चांगली कामगिरी केली होती. केरळच्या रोहन कुनुमलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. एन जगदीशन हे देखील या संघाचा एक भाग आहेत.

हेही वाचा – ICC Ranking: कसोटी क्रमवारीत मोठा बदल! बाबर आझमला फायदा तर स्टीव्ह स्मिथला झाला तोटा

४ वर्षांनंतर देवधर करंडक स्पर्धा होत आहे –

देवधर करंडक तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकदा ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. ही स्पर्धा शेवटची २०१९ मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर आता ही स्पर्धा आयोजित केले जाईल. वृत्तानुसार, देवधर करंडक २४ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत पुद्दुचेरीमध्ये खेळवली जाऊ शकते.

दक्षिण विभागाचा संपूर्ण संघ –

मयंक अग्रवाल (कर्णधार), रोहन कुनुमल (उपकर्णधार), एन जगदीसन (यष्टीरक्षक), रोहित रायडू, केबी अरुण कार्तिक, देवदत्त पडिककल, रिकी भुई (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, व्ही. कावेरप्पा, व्ही. वैशाख. कौशिक वी, मोहित रेडकर, सिजोमन जोसेफ, अर्जुन तेंडुलकर, साई किशोर.
स्टँडबाय: साई सुदर्शन, निकिन जोस, प्रदोष राजन पॉल, नितीश कुमार रेड्डी, केएस भरत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayank agarwal has been appointed as the south zone captain for the deodhar trophy vbm