किशोर-किशोरी मुंबई महापौर चषक राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पध्रेत किशोर गटात मुंबई उपनगर, ठाणे तर किशोरी गटात ठाणे संघाने विजयी सलामी दिली.
किशोर गटात उपनगरने पालघर संघाचा १९-११ असा ८ गुणांनी पराभव केला. उपनगरकडून कल्पेश चव्हाण (२.१० मि. व २.३०), रितेश मोरे (२.१० मि.), अक्षय साळुंके (६ बळी) व देविक हतपले (४ बळी) यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. ठाणे संघाने रायगडवर १७-९ असा एक डाव व ८ गुणांनी विजय संपादन करून मोहिमेची दिमाखात सुरुवात केली. मुलींच्या गटात ठाण्याने सिंधुदुर्ग संघावर १८-६ असा एक डाव व १२ गुणांनी मात केली. रेश्मा राठोड , प्राजक्ता िशदे , साक्षी तोरणे व दीक्षा सोनसूरकर यांनी बहारदार खेळ केला.
मुंबई – ठाण्याची विजयी सलामी
किशोर-किशोरी मुंबई महापौर चषक राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पध्रेत किशोर गटात मुंबई उपनगर, ठाणे तर किशोरी गटात ठाणे संघाने विजयी सलामी दिली.
First published on: 14-03-2015 at 06:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayor cup kho kho mumbai thane win