साऱ्या जगाचे लक्ष लागलेली फ्लॉईड मेवेदर व मॅनी पॅक्विओ यांच्यातील सुपरहेवीवेट गटाची बॉक्सिंग लढत लास व्हेगास येथे रविवारी होणार आहे. जागतिक बॉक्सिंग परिषदेतर्फे होत असलेल्या या लढतीस प्रेक्षकांचा हाउसफुल्ल प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.
मेवेदरने आठ वेळा जागतिक स्तरावर अजिंक्यपद मिळविले आहे, तर पॅक्विओने पाच वेळा जगज्जेतेपद पटकावले आहे. २००९मध्ये या दोन खेळाडूंमध्ये लढत आयोजित केली जाणार होती, मात्र काही तांत्रिक मुद्दय़ांवरून ही लढत होऊ शकली नव्हती. अखेर दोन्ही खेळाडूंनी यंदा या लढतीसाठी असलेल्या अटी मान्य केल्यानंतरच ही लढत निश्चित झाली आहे.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्सवर
वेळ : सकाळी ८ .१५ वा. पासून.
मेवेदर व पॅक्विओ यांच्यात आज बॉक्सिंगचे महायुद्ध
साऱ्या जगाचे लक्ष लागलेली फ्लॉईड मेवेदर व मॅनी पॅक्विओ यांच्यातील सुपरहेवीवेट गटाची बॉक्सिंग लढत लास व्हेगास येथे रविवारी होणार आहे.
First published on: 03-05-2015 at 01:07 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mayweather vs pacquiao