साऱ्या जगाचे लक्ष लागलेली फ्लॉईड मेवेदर व मॅनी पॅक्विओ यांच्यातील सुपरहेवीवेट गटाची बॉक्सिंग लढत लास व्हेगास येथे रविवारी होणार आहे. जागतिक बॉक्सिंग परिषदेतर्फे होत असलेल्या या लढतीस प्रेक्षकांचा हाउसफुल्ल प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.
मेवेदरने आठ वेळा जागतिक स्तरावर अजिंक्यपद मिळविले आहे, तर पॅक्विओने पाच वेळा जगज्जेतेपद पटकावले आहे. २००९मध्ये या दोन खेळाडूंमध्ये लढत आयोजित केली जाणार होती, मात्र काही तांत्रिक मुद्दय़ांवरून ही लढत होऊ शकली नव्हती. अखेर दोन्ही खेळाडूंनी यंदा या लढतीसाठी असलेल्या अटी मान्य केल्यानंतरच ही लढत निश्चित झाली आहे.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्सवर
वेळ : सकाळी ८ .१५ वा. पासून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा