आगामी विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी गतविजेत्या मुंबईच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे श्रेयस अय्यरकडे मुंबईचं कर्णधारपद सोपवण्यात आलं असून सूर्यकुमार यादव मुंबईचा उप-कर्णधार असणार आहे. २४ सप्टेंबरपासून मुंबईचा संघ आपले सर्व सामने बंगळुरुत खेळणार आहे. १७ सदस्यीय संघाची घोषणा करताना निवड समितीने सर्फराज खानला संघात स्थान दिलं आहे. याचसोबत नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या अथर्व अंकोलेकरलाही मुंबईच्या संघात स्थान मिळालं आहे. अंतिम फेरीत अथर्वने प्रतिस्पर्ध्याचा निम्मा संघ गारद केला होता.
विजय हजारे करंडकासाठी असा असेल मुंबईचा संघ –
श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), आदित्य तरे (यष्टीरक्षक), सर्फराज खान, शिवम दुबे, शुभम रांजणे, एकनाथ केरकर, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड, यशस्वी जैस्वाल, कृतिक हंगवाडी, शशांक अतार्डे
विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईच्या सामन्यांचं वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल –
- विरुद्ध सौराष्ट्र – २४ सप्टेंबर
- विरुद्ध झारखंड – २५ सप्टेंबर
- विरुद्ध कर्नाटक – २९ सप्टेंबर
- विरुद्ध केरळ – १ ऑक्टोबर
- विरुद्ध आंध्र प्रदेश – ३ ऑक्टोबर
- विरुद्ध गोवा – ५ ऑक्टोबर
- विरुद्ध हैदराबाद – ९ ऑक्टोबर
- विरुद्ध छत्तीसगड – १३ ऑक्टोबर