नकटीच्या लग्नाला जशी सतराशे विघ्न येतात, तशीच एकामागून एक विघ्ने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीपुढे येत होती. पण अखेर सोमवारी झालेल्या एमसीएच्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये निवडणुकीच्या तारखेवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून, दसऱ्यानंतर म्हणजेच १८ ऑक्टोबरला निवडणूक घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
‘‘एप्रिलमध्ये निवडणूक होणार होती, पण त्यावेळी आयपीएलची धामधूम होती.
त्याचवेळी स्पॉट-फिक्सिंग प्रकरण बाहेर आले. त्यानंतर १० जूनला मला बीसीसीआयच्या कोषाध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली. मग रत्नाकर शेट्टी हे एमसीएविरुद्ध न्यायालयात गेले आणि हे प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे आता जास्त विचार न करता १८ ऑक्टोबरला निवडणूक घेण्याचे ठरवले आहे,’’ असे एमसीएचे अध्यक्ष रवी सांवत यांनी सांगितले.
निवडणुकीची तारीख ठरवल्यानंतर ४५ दिवसांचा अवधी देण्याचा नियम आहे. त्यानुसार गणेशोत्सव, पितृपक्ष आणि त्यानंतर दसऱ्यानंतर येणाऱ्या शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या मुहुर्तावर निवडणूक होणार आहे.
एमसीएची द्वैवार्षिक निवडणूक १८ ऑक्टोबरला
नकटीच्या लग्नाला जशी सतराशे विघ्न येतात, तशीच एकामागून एक विघ्ने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) द्वैवार्षिक निवडणुकीपुढे येत होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-08-2013 at 04:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mca elections on october