मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) निवडणूक कधी होणार, याचे चर्वितचर्वण सध्या मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) खेळ विकास महाव्यवस्थापक प्रो. रत्नाकर शेट्टी यांच्या याचिकेवर २४ जुलैला दिवाणी कोर्टात सुनावणी होणार असून त्यानंतरच निवडणुकीची तारीख ठरवण्यासाठी बैठक बोलावली जाईल, असे सूत्रांनी सांगितले असून मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आता गणेशोत्सवानंतरच होणार असल्याचे म्हटले जात आहे.
अहमदाबाद येथील पाकिस्तानविरूद्धच्या ट्वेन्टी-२० सामन्यामध्ये एमसीएच्या अधिकाऱ्यांनी तिकीटांचा काळाबाजार केल्याचा आरोप रत्नाकर शेट्टी यांनी केला होता. त्यानंतर शेट्टी यांना आपली बाजू भक्कमपणे मांडता न आल्याने त्यांच्यावर पाच वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय एमसीएने घेतला होता. या निर्णयाविरोधात शेट्टी यांनी दिवाणी न्यायालयात याचिका दाखल केली असून त्यावर २४ जुलैला निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘‘ शेट्टी यांच्या याचिकेवर २४ जुलैला सुनावणी होणार असून त्याचीच एमसीए वाट पाहत आहे. त्यानंतरच आम्ही निवडणूकीच्या तारखेसाठी बैठक घेऊ,’’ असे सूत्रांनी सांगितले.
१५ जुलैला कार्यकारीणीची दोन वर्षे पूर्ण झाल्याने एमसीएची निवडणूक कधी होणार, यावर चर्चा सुरू आहे. २४ जुलैला येणारा निकाल पाहून पुढील आठवडय़ात निवडणूकीची तारीख ठरवण्यासाठी बैठक बोलावण्यात येण्याची शक्यता आहे. तारीख ठरवल्यावर ४५ दिवसांच्या अवधीनंतर निवडणूक घेण्याचा नियम असल्याने गणेशोत्सवानंतर निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, एमसीएची निवडणूक २० सप्टेंबरला होण्याची दाट शक्यता आहे, पण जर २० सप्टेंबरला निवडणूक झाली नाही, तर बीसीसीआयच्या निवडणूकीनंतरच एमसीएची निवडणूक होईल.
त्याचबरोबर या बैठकीमध्ये इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल), भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि एमसीएमधून मानधन मिळणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला निवडणूक लढवता येणार नाही, याविषयावरही चर्चा करण्यात आली.