Wankhede Stadium 50th Anniversary : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या वानखेडे स्टेडियमने पन्नाशी गाठली. या निमित्त वानखेडे स्टेडियमवर आठवठाभराचा सोहळा आयोजित केला आहे. दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनने बुधवारी (१५ जानेवारी) लिटल मास्टर सुनील गावस्कर आणि फारूक इंजिनियरसह मुंबईच्या आठ माजी खेळाडूंचा गौरव केला. त्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. हे आठ खेळाडूं १९७४-१९७५ मधील हंगामात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्याचा भाग होते.

पहिले जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई संघातील हे आठ सदस्य म्हणजे सुनील गावस्कर, करसन घावरी, पद्माकर शिवलकर, फारुख इंजिनियर, अजित पै, मिलिंद रेगे, अब्दुल इस्माईल आणि राकेश टंडन. या आठ खेळाडूंपैकी शिवलकर, घावरी, पै, रेगे आणि इस्माईल हे पाच खेळाडू या स्पर्धेदरम्यान उपस्थित होते. वानखेडेवर पहिला प्रथम श्रेणी सामना खेळलेल्या मुंबई संघाच्या सदस्यांचा सत्कार करण्यासाठी आयोजित कार्यक्रमादरम्यान एमसीएचे सचिव अभय हरप यांनी ही घोषणा केली.

Why Shiv Sainik Dug Wankhede Pitch in 1991 by Orders of Balasaheb Thackrey Before India vs Pakistan Match
Wankhede Stadium: बाळासाहेबांचा इशारा अन् शिवसैनिकांनी वानखेडेचं पिच खोदलं, पाकिस्तान बरोबरच्या ‘त्या’ सामन्यापूर्वी नेमकं काय घडलं होतं?
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Sunil Gavaskar and others felicitated by MCA at Wankhede Stadium
वानखेडे स्टेडियमचे योगदान महत्वाचे! सुनील गावस्कर यांची भावना; तारांकित खेळाडूंच्या उपस्थितीने क्रिकेट पंढरी दुमदुमली
Wankhede Stadium Ajaz Patel is the only bowler to take 10 wickets in an innings at Mumbai
Wankhede Stadium : मुंबईचे वानखेडे स्टेडियम एजाज पटेलच्या ‘या’ खास विक्रमाचे आहे साक्षीदार
Among the many exciting matches played at Wankhede Stadium these five are very special
Wankhede Stadium : धोनीचा विश्वविजयी षटकार ते फ्लिनटॉफचं शर्टलेस सेलिब्रेशन, ‘हे’ आहेत वानखेडे स्टेडियमवरील पाच रोमांचक सामने
Wankhede Stadium A Glorious Heritage of Cricket
Wankhede Stadium : क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमची काय आहेत वैशिष्ट्यं? जाणून घ्या
How Wankhede Stadium Built| History and Significance of Wankhede Stadium Mumbai
Wankhede Stadium Mumbai: मराठी माणसाच्या अपमानातून उभं राहिलं वानखेडे स्टेडियम, मुंबईतील ऐतिहासिक स्टेडियमच्या जन्माची रंजक कहाणी
Snicko technology Founder explains why it did not pick up anything in dismissal of Yashasvi Jasiswal in MCG
Yashasvi Jaiswal : जैस्वालच्या विकेटनंतर स्निको तंत्रज्ञानावर प्रश्न उपस्थित; संस्थापक म्हणाले, ‘हॉटस्पॉट असतं तर…’

अजिंक्य नाईक यांनी या पुरस्काराची घोषणा केली –

या समारंभात एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, “१९७४ मध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या प्रथम श्रेणी सामन्यात खेळलेल्या मुंबई संघाचे सदस्य आमच्यासोबत असल्याचा आम्हाला अभिमान आहे. ते खरोखरच वानखेडेचे रत्न आहेत आणि आम्ही त्यांचा खूप आदर करतो. प्रत्येक हयात असलेल्या सदस्याला १० लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.”

हेही वाचा – Wankhede Stadium : क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईच्या वानखेडेवर भारताचा कसा आहे रेकॉर्ड? जाणून घ्या

अधिकाऱ्यांनाही केले सन्मानित –

आयकॉनिक स्टेडियमच्या ५० वर्षांच्या स्मरणार्थ एमसीएद्वारे आयोजित केलेल्या आठवडाभराच्या उत्सवाचा भाग असलेल्या या कार्यक्रमादरम्यान प्रशासकीय मंडळाने १९७५ पासूनच्या आपल्या पदाधिकाऱ्यांचाही सन्मान केला. आदल्या दिवशी मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणेने वानखेडे स्टेडियम, बीकेसीमधील शरद पवार क्रिकेट अकादमी आणि कांदिवलीतील सचिन तेंडुलकर जिमखाना अशा विविध ठिकाणी मैदानाची देखभाव करणाऱ्या एमसीएच्या ग्राउंड्समनशी संवाद साधला.

हेही वाचा – Jasprit Bumrah : ही बातमी फेक न्यूज, मला हसायला आलं; जसप्रीत बुमराहने दुखापतीसंदर्भात बातमीवर दिली अशी प्रतिक्रिया

अजिंक्य रहाणेने ग्राउंड्समनचे केले कौतुक –

अजिंक्य रहाणे म्हणाला, “प्रत्येक संघाला सामन्यादरम्यान चांगली खेळपट्टी आणि चांगल्या मैदानाची अपेक्षा असते. तथापि, ग्राउंड्समनच्या मेहनतीकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. टीका करणं सोपं आहे, पण या कामासाठी लागणाऱ्या मेहनतीबद्दल फार कमी लोक विचार करतात. आज एमसीएने एक कौतुकास्पद पुढाकार घेतला आहे. तुम्ही ग्राउंड्समन मुंबई क्रिकेटसाठी महत्त्वाचे आहात. कोणताही संघ खेळायला आला, तरी तुमचे योगदान नेहमीच महत्त्वाचे असेल.”

Story img Loader