मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एसमीए) घटना गेल्या काही वर्षांमध्ये बदलल्या नसल्याने त्या दुरुस्तीच्या प्रक्रियेत आम्ही आहोत. आम्ही काही कार्यकारिणी समितीच्या बैठकी घेणार आहोत. त्याचबरोबर संलग्न क्लब्जशी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, असे एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले.
माजी अध्यक्ष शरद पवार यांना गेली निवडणूक वास्तव्याच्या नियमामुळे लढवता आली नव्हती. त्यांच्यासाठी नियमांत बदल केले जाणार का, असा प्रश्न विचारल्यावर सावंत म्हणाले की, कोणा एका व्यक्तीला डोळ्यापुढे ठेवून आम्ही घटनादुरुस्ती करत नाही. जुन्या घटनेमध्ये काही संदिग्धता होत्या, त्यामुळे दुरुस्ती करत आहोत. एखादी व्यक्ती व्यवसायामुळे किंवा अन्य कारणास्तव एकाच ठिकाणी वास्तव्य करत नाही. ज्या जागेची शिधावाटप पत्रिका असते तिथले आपण रहिवासी असल्याचे म्हटले जाते.

Story img Loader