सचिन तेंडुलकरच्या दोनशेव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यासाठी तिकीट विक्री सोमवारी सकाळी ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करण्यात येणार असून, मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) प्रत्येक दिवसाचे खास तिकीट तयार केले आहे.
एमसीए कोषाध्यक्ष विनोद देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘भारत-वेस्ट इंडिज या संघांमधील कसोटी सामन्यासाठी प्रत्येक दिवसाचे तिकीट खास पद्धतीने तयार करण्यात आले आहे. पाचही दिवस तिकिटांवर सचिनची वेगवेगळी छायाचित्रे असतील. यावर ‘सचिनची दोनशेवी कसोटी’ असे अधोरेखित करण्यात आले असून, त्याची स्वाक्षरीही आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सिंहाचे बोधचिन्ह आहे. या साऱ्या गोष्टींसोबत वानखेडे स्टेडियमची वास्तूही आहे.’’
 ते पुढे म्हणाले की, ‘‘तिकिटाच्या मागील बाजूस सचिनच्या क्रिकेट कारकिर्दीमधील महत्त्वाची क्षणचित्रे देण्यात आली आहेत. सचिनच्या कारकिर्दीतील पहिला, ५०वा, १००वा, १५०वा आणि २००वा सामना, प्रतिस्पर्धी, दिनांक, स्थळी ही माहिती नमूद करण्यात आली आहे.’’
 ‘‘सोमवारी सकाळी ऑनलाइन पद्धतीने तिकीट विक्रीला प्रारंभ होणार असून, ँ३३स्र्://६६६.‘८ं९ल्लॠं.ूे/ या संकेतस्थळावर ती उपलब्ध असेल,’’ असे देशपांडे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा