महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अखत्यारीत येणाऱ्या पुण्याच्या गहुंजे मैदानाचा, बँक ऑफ महाराष्ट्रने प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. मैदानाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बँक ऑफ महाराष्ट्रकडून 69.50 कोटींचं कर्ज घेतलं होतं. मात्र या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने ही कारवाई केल्याचं समजतं आहे. मात्र या कारवाईचा क्रिकेटवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिवांनी सांगितलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बँक ऑफ महाराष्ट्र, कर्नाटक बँक, बँक ऑफ बडोदा आणि आंध्र बँक या 4 शाखांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला 69.50 कोटींचं कर्ज मंजूर केलं होतं. या बँकाच्या मंडळाचं नेतृत्व बँक ऑफ महाराष्ट्र करत असून, योग्य वेळेत हप्ते न भरल्यास मैदानाचा ताबा घेण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांनी नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र या कारवाईचा महाराष्ट्राच्या संघाच्या सरावावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं बागवान यांनी स्पष्ट केलं आहे.

सहारा इंडिया समुहाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसोबत 215 कोटींचा जाहीरातींचा करार केला होता. मात्र सहारा समुहाने या करारातून माघार घेण पसंत केल्यामुळे असोसिएशनसमोर पैशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बीसीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासकीय समितीला संघटनेच्या हिस्स्यातला निधी तात्काळ देण्याची विनंती केली आहे. सध्या असोसिएशनने 4.5 कोटी रुपये बँकेकडे भरले असून कारवाई टाळण्यासाठी असोसिएशनला तात्काळ 12 कोटींची गरज असल्याचं कळतंय.