मुंबई क्रिकेट असोसिएशनचा (एमसीए) वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ २९ मे रोजी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबईला ऐतिहासिक चाळीसावे रणजी जेतेपद जिंकून देणाऱ्या खेळाडूंना केंद्रीयमंत्री शरद पवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
‘‘भारतीय क्रिकेट नियामक मंडळा(बीसीसीआय)कडून रणजी जेतेपदाचे दोन कोटी रुपयांचे रोख पारितोषिक आणि एमसीएकडून दोन कोटी रुपयांचे इनाम मुंबईच्या खेळाडूंना देण्यात येईल,’’ असे सूत्रांकडून समजते.
बीसीसीआयच्या अन्य स्पर्धामध्ये यश मिळविणाऱ्या संघांनाही यावेळी सन्मानित करण्यात येणार आहे. गेली सहाव्र्शे सर्वोत्तम फलंदाज आणि गोलंदाज हे पुरस्कार दिले गेले नव्हते. यावेळी हे पुरस्कारसुद्धा जाहीर करण्यात येणार आहेत, असे सूत्रांकडून कळते. मुंबईकडून खेळलेल्या सर्व माजी कसोटीपटू आणि रणजीपटूंना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Story img Loader