क्रिकेट कारकीर्द पुन्हा सुरू करण्याची परवानगी मागणारे पत्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) बंदी असलेला क्रिकेटपटू अंकित चव्हाणने मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे (एमसीए) सादर केले आहे. या विषयावर २ ऑगस्टला होणाऱ्या एमसीएच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.
‘‘मला पुन्हा खेळण्याची परवानगी द्या, अशी विनंती करणारे अंकितचे पत्र एमसीएला आले आहे. रविवारी होणाऱ्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत अध्यक्ष शरद पवार आणि अन्य सदस्य याबाबत चर्चा करतील,’’ असे एमसीएचे संयुक्त सचिव डॉ. पी. व्ही. शेट्टी यांनी सांगितले.
‘‘अंकितचा विनंती अर्ज आणि एमसीएचे पत्र आम्ही बीसीसीआयला पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्याची दाट शक्यता आहे, परंतु शेवटी बीसीसीआयचा निर्णय सर्वाना बांधील असेल,’’ असे त्यांनी पुढे सांगितले. दिल्ली न्यायालयाने अंकितला स्पॉट-फिक्सिंगच्या आरोपातून दोषमुक्त केले. आयपीएल २०१३ मधील या घटनेसंदर्भात बीसीसीआयने आपली स्वतंत्र चौकशी समिती नेमली होती. ते खेळाडूंवरील बंदी उठवायला तयार नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा