रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. विराट कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित आता तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित कर्णधार म्हणून मैदानात दिसणार आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) ‘हिटमॅन’चा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या एमसीएच्या शिखर परिषदेच्या बैठकीत रोहितचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिषदेच्या एका सदस्याने सांगितले, “आज सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत रोहित शर्माला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनवल्याबद्दल त्याचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोहितशिवाय अंडर-१९ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सलामीवीर अंगकृष्ण रघुवंशी यालाही एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.”

Kevin Pietersen praises Harshit Rana bowling as a connection substitute during IND vs ENG 4th T20I at Pune
Harshit Rana : “त्याची चूक नाही…”, इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे कनक्शन सब्स्टिट्यूट वादात हर्षित राणाच्या समर्थनार्थ वक्तव्य
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shardul Thakur take hat trick against Meghalaya for Mumba in Ranji Trophy 2025 match
Ranji Trophy 2025 : शार्दुल ठाकुरच्या भेदक गोलंदाजीसमोर मेघालयने टेकले गुडघे! नोंदवला रणजी ट्रॉफी इतिहासातील लाजिरवाणा विक्रम
Cricketer from Dombivli Shreyas Gurav has been selected in mumbai Ranji team
डोंबिवलीच्या श्रेयस गुरव यांची मुंबई रणजी संघात निवड
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
IND vs ENG Harry Brook Clean Bowled on Varun Chakravarthy in 2nd T20I Despite no Smog
IND vs ENG: “बघ धुकं आहे का?”, हॅरी ब्रुक वरूणच्या गोलंदाजीवर पुन्हा क्लीन बोल्ड, विकेट पाहून झाला चकित; VIDEO व्हायरल
Shreyas Iyer argues with umpires over controversial dismissal Ajinkya Rahane does interferen in Ranji Trophy 2025
Shreyas Iyer Controversy : आऊट झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि अंपायरमध्ये जुंपली, अजिंक्य रहाणेला करावा लागला हस्तक्षेप
IND vs ENG Abhishek Sharma Credits Gautam Gambhir and Suryakumar Yadav's Backing For His Return To Form
IND vs ENG : ‘मला पूर्ण स्वातंत्र्य दिले…’, अभिषेक शर्माने आपल्या वादळी खेळीचे श्रेय कोणाला दिले? जाणून घ्या

हेही वाचा – Ind vs SL: ६२ धावांनी विजय मिळवल्यानंतरही कर्णधार रोहित संघावर नाराज; म्हणाला, “या स्तरावर खेळताना…”

एमसीएने भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि फलंदाज सूर्यकुमार यादव यांचाही सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनने सांगितले, की आयपीएल २०२२ पूर्वी एक सत्कार समारंभ आयोजित केला जाईल, ज्यामध्ये पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांचाही सन्मान केला जाईल.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ४४ धावा करणारा रोहित शर्मा या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३३०७ धावा केल्या आहेत. या प्रकरणात त्याने मार्टिन गप्टिलला (३२९९ धावा) मागे टाकले आहे.

Story img Loader