आंतर-शालेय आणि आंतर-महाविद्यालयीन स्पर्धामध्ये १५ खेळाडूंना खेळण्याची संधी द्यावी, अशी भूमिका भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मांडली होती. आपल्या या भूमिकेबाबत सचिन आग्रही असून या फॉम्र्युल्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) १४ ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे.
शाळेतील आणि महाविद्यालयांतील मुलांना खेळण्याची संधी मिळाली नाही तर ते निराश होऊन क्रिकेट सोडून देतात; पण हे टाळण्यासाठी आंतर-शालेय आणि आंतर-महाविद्यालयीन स्पर्धामध्ये १५ खेळाडूंना खेळण्याची संधी द्यावी, असे सचिनने एका कार्यक्रमामध्ये सांगितले होते. यावर एमसीएच्या तांत्रिक समितीमध्ये चर्चा झाली होती; पण याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येत नव्हता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिन आपल्या या भूमिकेबाबत आग्रही होता. एमसीएच्या तांत्रिक समितीने दोनदा हा प्रस्ताव नामंजूर केल्यावर सचिनने थेट एमसीएचे अध्यक्ष शरद पवार यांना गळ घातली आणि पवारांनी एमसीए पदाधिकाऱ्यांना याबाबत चर्चा करण्यास सांगितले. सचिनच्या या भूमिकेवर एमसीएच्या आगामी बैठकीमध्ये चर्चा होणार असून यामधून आंतर-शालेय आणि आंतर-महाविद्यालयीन क्रिकेटमध्ये सकारात्मक बदल घडतील, अशी आशा क्रिकेटरसिकांना आहे.
फॉम्र्युलावर एमसीए चर्चा करणार
आंतर-शालेय आणि आंतर-महाविद्यालयीन स्पर्धामध्ये १५ खेळाडूंना खेळण्याची संधी द्यावी, अशी भूमिका भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने मांडली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-09-2014 at 04:42 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mca to revisit sachin tendulkars 15 a side idea